वर्धा,साटोडा -/ स्थानिक जी प शाळेत मुख्याध्यापक रवींद्र पावडे यांचे अध्यक्षतेखाली तर प्रमुख अतिथी म्हणून अरुणा हजारे,नितेश आडे,मंजिरी डुकरे, जयवंता नेवारे विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करण्यात आली,याप्रसंगी मंजिरी डुकरे यांनी त्रंतज्ञान कसे विकसित केले व त्याचा फायदा भारतवासियांना कसा झाला हे विषद केले.
तसेच रविंद्र पावडे यांनी राजीव जिंचे जीवन चरित्रावर प्रकाश टाकला .रक्षाबंधन सर्वधर्म समभा वाचे प्रतीक आहे हे सांगून अनेक दाखले देऊन या सणाचे महत्त्व विषद केले,यानंतर मुलींनी मुलांना,शिक्षकांना राख्ख्या बांधण्यात आल्या ओवाळणी म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या,मुलांना खाऊ वितरीत करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन नितेश आडे यांनी केले तर रुण निर्देश अरुणा हजारे यांनी मानले.