वर्धा -/प्राथमिक आरोग्य केंद्र आंजी तर्फे डॉक्टर विराज घुरडे यांचे मार्गदर्शनात व आरोग्य कर्मचारी,लॅब टेक्निशियन,आरोग्य सेविका,आशा वर्कर यांचे उपस्थितीत रक्त तपासणी,Bp, सुगर, कृष्ठरोग तपासणी, आयुष्मान,भारत गोल्ड कार्ड काढणे,कर्करोग ,हृदय रोग तपासणी, आउष्धोपचार करण्यात आला.कार्यक्रमास अध्यक्ष बादल विरुटकर (सरपंच)प्रमुख पाहुणे प्रीती शिंदे(उपसरपंच)मुख्याध्यापक रविंद्र पावडे व अन्य उपस्थित होते.प्रारंभी सावित्रीआई फुले यांचे प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलित करण्यात आले,मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.प्रास्ताविक अनिता देशमुख(कृष्ठरोग् त्रंत्रद्र)यांनी तर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन रंजना मून यांनी केले,आभार रविंद्र पावडे यांनी मानले,सोबतच संत सेवालाल महाराज यांची जयंती पण साजरी करण्यात आली.कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य अजय जानवे, पार्बता रहांडगले ,ग्राम विस्तार अधिकारी चौहान साहेब, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरुणा हजारे,नितेश आडे,मंजिरी डुकरे ,आशा वर्कर ,रंजना चहारें ,रंजना मून यांनी अथक परिश्रम घेतले ,सर्वाँना अल्पोहार देण्यात आला.