सामान्य जनतेच्या वाहनावर दंड करणाऱ्या वाहनावर PUC समाप्त झाली असून दंड करणार कोण ? -आशिष सोनटक्के जिल्हाध्यक्ष भिम आर्मी….

0

🔥सामान्य जनतेच्या वाहनावर दंड करणाऱ्या वाहनावर PUC समाप्त झाली असून दंड करणार कोण ? -आशिष सोनटक्के जिल्हाध्यक्ष भिम आर्मी.

वर्धा -/ दिनांक 09/03/2026 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यलया (RTO)सालोड हिरापूर वर्धा येथे कामानिमित्त गेलो असताना कार्यलया बाहेर उभे असलेले MH 04MF4399 या शासकीय (आरटीओ अधिकारी याचे) वाहनांची पीयूसी (PUC)समाप्त होऊन पाच महिने झाल्यावरही सदर वाहनावर दंड/चालन करणार कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे
कार्यालयासमोर शासकीय वाहन क्रमांक MH04MF4399 सदर आरटीओ नी रडार हे नाव दिलेले आहे, परंतु त्या गाडीची पीयूसी(PUC)प्रदूषण नियंत्रण खाली ही दिनांक 30/10/ 2025 रोजी समाप्त झाले असून गेल्या पाच महिन्यापासून संपले आहे हे दिसून आले, सतत वाहन कारवाईसाठी काम करत असून सामान्य जनतेच्या वाहनावर सतत दंड आकारनारी वाहन ,सामान्य जनतेच्या वाहनावर थोडं कागदपत्रे नसल्यास हजारो ची दंड करणारी RTO अधिकारी यांच्या वाहनावर आता दंड करणार काय ? असा प्रश्न भिम आर्मी जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के यांनी केला आहे.
त्याचबरोबर सतत अधिकारी त्यावर प्रवास करून कार्यवाही करत असताना कोणत्याही अधिकारी यांचे लक्ष कसे नाही ? RTO अधिकारी असे तर नाही करत दुसऱ्याचे पहा वाकून आणि आपले ठेवा झाकून असे असा ही प्रश्न आता संघटनेला पडला आहे.
सामान्य जनतेच्या वारंवार जनजागृती करत पियुषी,इन्शुरन्स,फिटनेस विविध कागदपत्रे सतत रीनिव्हल करत चला सांगणारे आरटीओ अधिकारी हजारो रुपयाची चलान दंड आकारतात तर मग आता या वाहनावर चालन करणार कोण ? आता असे तर नाही होणार की सामान्य जनतेच्या वाहनाला नियम वेगळा व शासकीय वाहनाला नियम वेगळा आहे का ?असा प्रश्न आता निर्माण होत आहे .याबाबत संबंधित अधिकारी यांना विचारणा केली असता जन माहिती अधिकारी तथा मोटार वाहन निरीक्षक संदीप मुखे यांनी दिशाभूल व उडवाउडवीची उत्तर देणे सुरू केले त्यामुळे सदर वाहनावर चालन करणार कोण ? किंवा नेहमी प्रमाणे हात झटकून मोकळे करणार काय ? सदर वाहनावर दंड आकारण्यात यावा.
व संबंधित अधिकारी यांनी पाच महिन्यापासून वाहनावर प्रवास / करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास वरिष्ठ अधिकारी याचे कडे तक्रार दाखल करणार
त्यामुळे न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल असे आपले सरकार वर जिल्हाधिकारी वर्धा,जिल्हा पोलीस अधीक्षक वर्धा ,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा ,तक्रार दाखल केली अशी माहिती आशिष सोनटक्के जिल्हाध्यक्ष भिम आर्मी यांनी दिली.

           ब्युरो रिपोर्ट                        साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!