सायकल चोरी करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले गजाआड

0

क्राईम प्रतिनिधी / वर्धा :

वर्धा शहरातील कच्ची लाईन परिसरातून किराणा दुकाना समोरून सायकल चोरून नेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात 5 जानेवारीला देवराव विजय ताजणे रा. कळंबे ले आउट वर्धा यांनी दिली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

गुन्हे शोध पथकाचे जमादार संजय पंचभाई यांनी तपास सुरू केला व पूजई येथील प्रकाश कवडु बाभुळकर वय 31 वर्ष ह. मु. रेल्वे स्टेशन याला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून एकूण सात सायकली जप्त करण्यात आल्या आल्या आहे सर्व सायकल ची किंमत 28 हजार 700 रुपये आहे. यावर आरोपी प्रकाश बाभुळकर विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे संजय पंचभाई सुनील मेंढे, श्याम सलामे, गणेश आत्राम यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!