सालबर्डी तीर्थक्षेत्र ला जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी नाश्त्याचा उपक्रम…

0

आष्टी शहीद / मध्य प्रदेशाच्या कुशीत वसलेल्या सालबर्डी तीर्थक्षेत्राच्या यात्रेकरू भक्तांकरीता महाशिवरात्री दिनानिमित्त ठिकठिकाणी उपासाच्या नाश्त्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आष्टी तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभाग रोप वाटिका विठ्ठलापुर मोशी रोड या ठिकाणी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र आष्टी च्या वतीने सालबर्डी तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी उपवासाच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती या निमित्य महिला दिन सुद्धा वनविभागाच्या वाटिकेत साजरा करण्यात आला. सालबर्डी ला जाणाऱ्या सर्व भाविक भक्त नाश्त्याचा आस्वाद घेऊन सालबर्डीला दर्शनाला गेले याप्रसंगी पाच हजाराच्या जवळपास भाविकांनी याचा लाभ घेतला. असून असा हा अनोखा उपक्रम सामाजिक वनीकरण विभागाने राबवला. या उपक्रमात सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी आत्राम, वनपाल वाडके ,वनरक्षक इंद्रपाल भगत, वनरक्षक चंदू शेंडे यांच्यासह कर्मचारी, कामगार, व गावातील नागरिकांनी सहभाग नोंदविला.
तसेच आष्टी शहराच्या परिसरातून सालबर्डी ला जाणाऱ्या भक्तांकरीता नवीन आष्टी येथे नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी सुद्धा दर्शनाला जाणाऱ्या पाच ते सहा हजार भाविकांनी लाभ घेतला.
असा हा उपक्रम राबवून महादेवाच्या दर्शनाला जाणाऱ्या भक्तांसाठी उपकारी ठरला. असून यामध्ये समाज सेवाभावी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

नरेश भार्गव साहसिक न्यूज /24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!