🔥साहुर ग्रामपंचायतची कचरा गाडी हिच ती कचऱ्याच्या ढिगार्यात.
🔥गाडीवाला आया घरसे कचरा निकाल हा आवाज झाला बंद.
🔥कचऱ्याची विल्हेवाट लागत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
साहुर,आष्टी -/ तालुक्यातील साहुर हे एक मोठ्या वस्तीचे गाव असून चार वार्डात विभागले गेले आहे गेल्या अनेक महिन्यांपासून साहुर ग्रामपंचायतची कचरा गाडी बंद असुन गावातील कचऱ्याची विल्हेवाट लागत नसल्याने गावामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे आता लगेचच पावसाळ्याला सुरुवात होत असून त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची संभावना व्यक्त करण्यात येत आहे कारण गावातील प्रत्येक घराला ओला कचरा व सुका कचरा टाकण्याकरिता बकेटीचे वाटप करण्यात आले व तयार झालेल्या कचऱ्याची ई रिक्षा गाडी गावामध्ये फिरवून ओला कचरा व सुका कचरा जमा करून गावाच्या बाहेर टाकण्यात येत होता त्यामुळे गावामध्ये स्वच्छता राहाची परंतु गेल्या काही महिन्यापासून ई रिक्षा गाडी बंद असुन हीच गाडी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडली आहेत त्यामुळे गावामध्ये घाणीचे साम्राज्य तयार झालेले आहेत जर घंटागाडी चालु नाही झाली तर देण्यात आलेल्या ओला कचरा व सुका कचऱ्याच्या बकेटा ग्रामपंचायतला परत देणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले त्यामुळे ही कचरा गाडी लवकरात लवकर चालू करून गावातील घाण कचरा गावाच्या बाहेर टाकण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहेत.