साहुर,आष्टी -/तालुक्यातील साहुर येथुन वडाळा रस्ता गेला असुन त्या रस्त्याची अतिशय दैनिय अवस्था झाली होती याचा लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळे या रस्त्याच्या कामाला निधी मिळाला आणि या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली परंतु या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून येत आहे रस्त्याच्या कडेला मुरूम टाकला परंतु दबाई न करता त्यावर गिट्टि टाकण्यात आली कुठल्याही प्रकारची पाणी न वापरता आणि दबाई न करता गिट्टि टाकण्यात आल्याने जनतेच्या सामोर प्रश्न निर्माण झाला आहे की रस्ता किती दिवस टिकेल याबाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे याची लवकरात लवकर दखल घेतली नाही तर नागरिकांनी सामोर येण्याची इच्छा व्यक्त केली या कामाची संबंधित विभागाने चौकशी करून ईस्टीमेट नुसार काम होते की नाही याची शहानिशा करणे गरजेचे आहे.