आष्टी, साहूर -/ तालुक्यातील साहुर येथे बसस्थानकावरून गावात जाण्यासाठी रस्ता तयार केला गेला असुन दोन्ही बाजूला नाली करायला पाहिजे परंतु नाल्या नसल्याने रस्त्यालगत असलेल्या घरात सरळ पाणी शिरत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत हा रस्ता मुख्य रस्ता असुन पुर्ण सिमेंटचा करण्यात आला आणि त्याला भेगा सुध्दा पडलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार असून अर्धवट कामे केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे अंकुश कोराटे यांचे मोठे नुकसान झाले आहे घरात व दुकानात पाणी शिरत असल्याने पुन्हा मोठे संकट येणार असल्याच्या चर्चा आता साहुर गावात रंगत आहे हे विशेष याकडे ग्रामपंचायत च्या वतीने लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.