साहुर येथे पाण्याकरीता महिलांचा घागर घेऊन ग्रामपंचायत वर मोर्चा….

0

साहुर,आष्टी -/ तालुक्यातील साहुर या गावात पाण्याचा हाहाकार माजला आहेत काही दिवसांच्या नंतर अनेक अडचणी निर्माण होऊन लोकांना पाणी मिळत नसल्याने महिलांनी घागर घेऊन ग्रामपंचायत वर धडक मोर्चा काढला असून पाण्याची मागणी केली स्थानिक गडकरी लेआउट मधील महिला सह ग्रामस्थांना सध्या भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे सहा ते सात दिवसापासून पाणीपुरवठा बंद असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे त्यामुळे नियमित पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी महिलांनी घागर आणि गुंड घेऊन बुधवार 5 जूनला ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला उन्हाचा पारा 45 अंशावर गेला असून येथील पाणी समस्या बिकट झाली आहे पाण्यासाठी पुरवठा योजनेअंतर्गत पुरेसे पाणी मिळत नसल्याने येथील महिला व पुरुषांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे परिणामतः रखरखत्या उन्हात पाण्या अभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे उन्हाचा पारा 45 अंशावर गेल्याने पाण्याची पातळी दररोज खाली जात आहे महिलासह नागरीक त्रस्त झाले असून त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे ग्रामपंचायतचे नियोजनबद्ध काम नसून लोकांना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत पाणीपुरवठा करण्याकरिता योजना कार्यान्वित करण्यात आली तरीही येथील पाण्याची टंचाई निकालात न निघता वारंवार बिघाड आल्याने येथे अनेक वेळा पाणीपुरवठा बंद असतो सध्या फक्त गडकरी लेआउट मधील पाणीपुरवठा बंद असून येथे प्रत्येक घरी पाणीपुरवठा बरोबर होत नसल्याचे नागरिक सांगतात येथील महिला पाण्या अभावी चांगल्याच वैतागल्या असून संतप्त महिलांनी ग्रामपंचायत वर घागर मोर्चा नेला सदर घागर मोर्चामध्ये विमल बोटरे शोभा अमझिरे राधा नेहारे विमल कुरवाडे प्रेमीला लवणकर अनिता कुरवाडे ममता गोमासे माला आत्राम कल्पना बोटरे संगीता अमझिरे पंचफुला बोटरे शीतल कुरवाडे संध्या बोटरे रेखा कुरवाडे कांता अमझिरे दिपाली लवणकर सुनीता नागोसे पार्वता मेश्राम नंदा वरकड प्रीती बोटरे इत्यादी महिला सहभागी होत्या सर्व महिलांनी सरपंचाकडे नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी रेटून धरली असता सरपंचांनी ताबडतोब पाईपलाईन दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरू करू असे आश्वासन दिले.

शरद वरकड साहसिक न्यूज -/ 24 साहूर आष्टी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!