आष्टी -/तालुक्यातील साहुर येथील बँक ऑफ इंडिया मध्ये गेल्या एक ते दोन वर्षा आधी पासून काही शेतकऱ्यांना व ग्राहकांना कॅश पैसे मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत जर ग्राहकांना कॅश पैसे हवे असेल तर त्यांना मिळत नसून दुसऱ्याच्या अकाउंट वर जमा करावे लागतात त्यानंतर तो व्यक्ती आपल्या अकाउंट वरचे पैसे काढून त्याला देतो त्यामुळे पैसे मिळण्याची पूर्ण विश्वास नसते अशा प्रकारचा प्रकार साहूर येथील बँक ऑफ इंडिया येथे सुरू असून शेतकरी त्रस्त झालेले आहेत शेतकऱ्यांचे गेल्या एक वर्षापासून खाते निल असून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे कर्ज नाहीत तरीसुद्धा शेतकऱ्यांना कॅश पैसे न मिळत असल्याने शेतकरी वैतागून गेलेले आहेत एक ते दीड वर्ष आधी ज्या शेतकऱ्यांवर कर्ज होते त्यांचे खाते गोठविलेले होते त्यानंतर शेतकऱ्यांनी तसेच ग्राहकांनी आपले कर्ज नील केले परंतु एक वर्ष पूर्ण होऊन सुद्धा ग्राहकांना दुसऱ्याच्या अकाउंट वर पैसे जमा करावे लागतात त्यामुळे मोठी अडचण शेतकऱ्यांवर व ग्राहकांसमोर निर्माण झालेली आहेत जर लवकरात लवकर याचा तोडगा काढला नाही तर शिवसेना शाखा साहुर च्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे साहुर येथील शिवसेना शाखाप्रमुख विजय गावंडे , प्रफुल मुंदाने, प्रवीण मोहिते ,प्रवीण धांदे ,छगन ढोरे इत्यादी शिवसैनिकांनी सांगितले हे विशेष