साहेब, मला कितीही मारा मी झुकणार नाही : वर्धेचा अल्पवयीन ‘पुष्पा’ पोलिसांच्या ताब्यात
क्राईम प्रतिनिधी/ वर्धा :
शाळेपासून 17 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत असलेल्या जुना वादाचे पर्यावसन थेट हाणामारीत झाले. यात आरोपी युवकावर नव्याने प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाचा फिवर चढला होता. आरोपी मुलाला ताब्यात घेतले असता त्याच्यावर पुष्पा चित्रपटचा प्रभाव पडलेला दिसून आला. तो वेगवेगळे डायलॉग मारत होता.
तरुणांना सध्या नवीन सिनेमांचे वेड लागले आहे.
नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या डायलॉग आता जागोजागी ऐकायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर सिनेमाच्या ऍक्शनचा सध्या तरुणांवर फिवर चढला आहे. अशाच एका पुष्पाला सेवाग्राम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका जुन्या वादातून या अल्पवयीन पुष्पाने दुसऱ्या अल्पवयीन मुलावर चाकूने वार केल्याची घटना मंगळवारी गांधीग्राम महाविद्यालयाच्या परिसरात घडली. जखमी मुलावर सध्या सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी सेवाग्राम पोलीस ठाण्यात आणताच त्याने पोलिसांना पाहून ”साहब, कितना भी मार लो लेकिन झूकेगा नहीं… साला, मै झुकेगा नाही मुझे बहोत मारो लेकिन मेरे माँ बाप को कुछ मत बोलो ..” असे म्हणत पोलिसांशीच हुज्जत घातली.
जुन्या वादाचे पर्यावसन हाणामारीत वर्धेच्या गांधीग्राम महाविद्यालयात घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आहे. याला कारणही तसंच आहे. शाळेपासून 17 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत असलेल्या जुना वादाचे पर्यावसन थेट हाणामारीत झाले. यात आरोपी युवकावर नव्याने प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाचा फिवर चढला होता. आरोपी मुलाला ताब्यात घेतले असता त्याच्यावर पुष्पा चित्रपटचा प्रभाव पडलेला दिसून आला. तो वेगवेगळे डायलॉग मारत होता. त्यामुळे पालकांनी आपला पाल्य काय करतो ? काय पाहतो ? कुठे जातो ? हे तपासण्याची गरज आहे. अन्यथा मोठी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आवाहन सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांनी केले आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले असता तो फिल्मी डायलॉग मारत होता. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या मुलाचे समुपदेशन करून त्याला अशी घटना यापुढे न करण्याचे समजावून सांगितले. त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे.