🔥14 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त.🔥सिंदी पोलिसांची धडक कारवाई
सिंदी (रेल्वे)-/ येथील वार्ड क्रमांक 8 मधील अवैद्य दारू विक्री करणाऱ्या महिलेच्या घरी पोलिसांनी छापा टाकला असता 14 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी आशा प्रशांत पागोटे वय 31 वर्ष हिच्यावर अवैद्य दारू विक्री प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या कारवाईमुळे शहरात अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
याबाबत सिंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुखबिराकडून वार्ड क्रमांक 8 मधील छोट्या मस्जितजवळ आरोपी आशा प्रशांत पागोटे ही महिला तिच्या राहत्या घरून अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री करीत असल्याबाबत पोलिसांना माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी पंचासमक्ष आशा पागोटे यांच्या राहत्या घरी छापा टाकून घराची झडती घेतली असता वेगवेगळ्या पिशवीमध्ये तसेच एका चुंगडीमध्ये 180 एमएल काचेच्या सीलबंद 67 लावणी कंपनीच्या शिष्या किंमत 10 हजार 50 रुपये तसेच ऑफिसर चॉईस कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एमएलच्या सीलबंद 17 काचेच्या शिष्या किंमत 4 हजार 250 रुपये असा एकूण जुमला किंमत 14 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आशा पागोटे हिचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई)77 (अ) अन्वये गुन्हा नोंद केला. आरोपी ही महिला असल्याने तिच्यावर कलम 35 (3) भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 प्रमाणे सुचनापत्र देऊन पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. सदर ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानुसार ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय श्यामसुंदर सूर्यवंशी, पोलीस हवालदार प्रफुल डफ, आनंद भसमे, शालू नेहारे, गणेश वाघ यांनी केली आहे.