सिंदी येथे नाफेडमार्फत चणा खरेदीचा शुभारंभ; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

0

🔥सिंदी येथे नाफेडमार्फत चणा खरेदीचा शुभारंभ; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

सिंदी-सेलू,-/ हंगाम 2025–26 अंतर्गत तूर व हरभरा (चना) पिकांची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नाफेडमार्फत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी येथे खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 रोजी समितीच्या मुख्यालयात चणा खरेदीचा शुभारंभ पार पडला.

समितीचे सभापती श्री. केशरीचंद बाळारामजी खंगारे यांच्या हस्ते काटा पूजन करून खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसभापती श्री. प्रमोद वामनरावजी आदमने, सन्माननीय सदस्य श्री. गोपालजी कोपरकर तसेच समितीचे सचिव तथा मुख्याधिकारी श्री. महेंद्र अशोकराव भांडारकर उपस्थित होते.

शासनाने हरभरा (चना) साठी रुपये 5875 प्रति क्विंटल असा हमीभाव निश्चित केला असून नाफेडच्या निकषांनुसार खरेदी करण्यात येत आहे. उद्घाटन प्रसंगी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. यामध्ये देऊळगाव येथील श्री. विठ्ठल केदारजी वैद्य (40 क्विंटल), श्री. अविनाश माणिकराव कांबळी (40 क्विंटल), श्री. श्याम रामदास भुते (40 क्विंटल), श्री. दिनेश मोरेश्वर भोंगाडे (11 क्विंटल) तसेच श्री. अरुण नारायणराव गोंडगे (28 क्विंटल) यांनी आपला हरभरा विक्रीसाठी आणला.

उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संबंधित शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

दरम्यान, शासकीय हमीभावाने खरेदीसाठी हरभरा नोंदणी प्रक्रिया दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत सुरू असून शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह समिती कार्यालयात नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीमार्फत करण्यात आले आहे.

         ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 सेलू,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!