🔥हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे झाले दर्शन.
सिंदी (रेल्वे) -/ईद ए मिलाद, इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्ताने शहरात मुस्लीम बांधव एकत्रित येऊन हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस साजरा केला. त्या निमित्ताने सर्व मुस्लीम बांधव मोठी जामा मस्जिद येथे एकत्रित येऊन मोठ्या हर्षोल्हासात शहरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मात्र हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये एकात्मतेचे दर्शन झाले.
इस्लाम धर्मात ईद-ए-मिलाद उन-नबी हा विशेष सण मानला जातो. हा दिवस इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो. याला ‘बारावफात’ असेही म्हटले जाते. येथे बाराचा अर्थ १२ आणि वफात म्हणजे इंतकाल (निधन) असा होतो. याच दिवशी मोहम्मद पैगंबर यांचे निधनही झाले होते. अरबी भाषेत मौलिद शब्दाचा अर्थ जन्माशी निगडित आहे. मौलिद उन नबीचा अर्थ हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस असा होतो. मिलाद उन्नबी किंवा ईद-ए-मिलाद या वर्षी सोमवारी १६ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद निमित्त शहरातील मोठी जामा मशिदी परिसरात आकर्षक रोषणाई तसेच पताका लावण्यात आली होती. सकाळी ९ वाजता शहराच्या मुख्य मार्गाने जुलूस काढून नंतर मशिदीमध्ये नमाज पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी शहरात जुलूस काढला. यावेळी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या. दुपारी १ वाजता ईद-ए-मिलादनिमित्त काढलेल्या जुलूसचा परचम कुशाई करून फतेहा व सलामाने समारोप झाला. यावेळी शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. ठाणेदार संतोष दरेकर यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. जमिल खान, जिलानी सूर्या, अजिम शाह, ईसराईल सुफि, ईमरान सुफि, ईकबाल भाईजी, सकिल शेख, मोहसिन शेख, अकिल शेख, फीरोज बेरा, आफताब कुरैशी, आरिफ शेख आसिफ भाई जवाई आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔥ईद-ए-मिलाद निमित्त अल्पोहाराचे वाटप.
ईद-ए-मिलाद निमित्त निघालेल्या मिरवणुकीत सामील झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांना येथील एकता युवा मंडळाच्या वतीने अल्पोहाराचे व थंडपेयाचे वाटप करण्यात आले. यातून हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन झाले. याप्रसंगी मंडळाचे नरेंद्र पेटकर, राजेंद्र तेलरांधे, रविंद्र ढोबळे, इसराईल सुफी, कवडू म्हैसकर, गुड्डू पालीवाल, पुरुषोत्तम व्यास, रमाकांत बोकडे, संजय मुडे, चंफू भंसाली, सचिन मोरस्कर, जमील खान, जिलानी सुरीया, शकील शेख, रोशन तडस, अजीम शाह, राजू उरकुडकर, तुषार ठोंबरे, प्रशांत कामडी, निखिल लष्करे, पंकज महाकाळकर व मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.