सिंदी शहरात बहुजन संघर्ष यात्रेचे आगमन…

0

🔥यात्रेला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद.

🔥शहरात विविध ठिकाणी बहुजन संघर्ष यात्रेचे स्वागत.

सिंदी (रेल्वे) / देशात बहुजनांच्या उत्थानासाठी फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा देशभर पोहचवून बहुजनामध्ये राजकीय चेतना निर्माण करणारे व ‘होऊ शकत है’ हा विश्वास समाजामध्ये निर्माण करणारे बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या जयंतीनिमित्त बहुजन संघर्ष यात्रा बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांच्या नेतृत्वात सिंदी शहरात शनिवारी आगमन झाले.
भारतीय संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी, बेरोजगारांना रोजगार निर्माण करण्यासाठी, ई. व्ही. एम बंद करून बॅलेट पेपरने निवडणूक घेण्यासाठी, खाजगीकरण, कंत्रातीकरण बंद व्हावे यासाठी, सरकारी जुनी पेन्शन योजना पूर्वत सुरू करण्यासाठी, स्वामिनाथन आयोग लागू करून शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी, कामगारा विरूध्द केलेले कायदे रद्द करण्यासाठी, आर.टी.ई. अंतर्गत २५ टक्के ऍडमिशन मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मिळण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी आरोग्य व शिक्षण याकरील बजेट वाढविण्यासाठी, रिझर्वेशन इन प्रमोशन बिल लागू करण्यासाठी, महाराष्ट्रातील ६५ हजार बंद केलेल्या जि.प.शाळा पून्हा सुरू करण्यासाठी, वर्ग २, ३ व ४ च्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कंत्राटी पध्दतीने होणाऱ्या नियुक्त्यांचे कंत्राटीकरण बंद करण्यासाठी, स्त्रियांवरील होणाऱ्या अन्याय, अत्याचार बंद करण्यासाठी, बहुजनांचे शासन प्रस्थापित करून शोषण व अन्यायाच्या व्यवस्थेचे उच्चाटन करून समतामूलक समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी, पोस्टमॅट्रीक स्कॉलरशिप मासिक मिळण्यासाठी अश्या आदी मागण्या घेऊन 1 मार्च पासून संपुर्ण जिल्हाभर बहुजन संघर्ष यात्रेचे आयोजन कांशीराम साहेब यांच्या जयंतीनिमित्त केले आहे. परिणामी, हिंगणघाट, जांब, कांढळी मार्गे शनिवारी २ मार्च रोजी सिंदी शहरात आगमन झाले.
बहुजन संघर्ष यात्रेचे आगमन होतात शहरात विविध ठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या जयंतीनिमित्त बहुजन संमेलन व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १५ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता जयभीम बुध्द विहारासमोरील मैदान सिंदी (मेघे) वर्धा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांनी यावेळी केले.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज /24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!