आर्वी -/विधान परिषदेच्या झालेल्या रिक्त जागेसाठी 27 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे जेष्ठ आणि अनुभवी नेते श्री सुधीरजी दिवे यांना भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून आज दिनांक 9 मार्च 2025 रविवारला आर्वी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, पदाधिकारी यांनी *केंद्रीय मंत्री माननीय ना. श्री नितीनजी गडकरी साहेब* यांची त्यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले भाजपचे जेष्ठ नेते ब्रिज मोहनजी टावरी, उत्तमरावजी करांगळे, बाबूजी लढ्ढा यांचे नेतृत्वात आर्वी मतदारसंघातील 81 कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने माननीय ना. श्री नितीनजी गडकरी यांना भेटून सुधीर दिवे यांनी गेल्या ३० वर्षापासून पक्षासाठी निष्ठापूर्वक केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा आग्रह धरला.या शिष्टमंडळात आर्वी मतदार संघातील आर्वी,आष्टी, कारंजा तालुका अध्यक्ष, विधानसभा प्रमुख, जिल्हा पदाधिकारी, यांचे सह ज्येष्ठ नेते प्रभाकरराव शिरभाते राजूभाऊ राठी बाबासाहेब कंगाले अनंत नवलाखे,शंकरराव राठी, वसंतराव भांगे, सामाजिक कार्यकर्त्या सौ शैलाताई देशपांडे यांचे सह भाजपच्या आजी-माजी सर्व पदाधिकाऱ्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.