सुमित वानखेडेंचा पाठपुरावा कामी,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई….

0

🔥शेतकरी हितार्थ सुमित वानखेडेंनी पालकमंत्र्यांना केली होती आग्रही मागणी.

🔥सुमित वानखेडेंनी सुधीर मुनगंटीवार यांना केलेल्या मागणीमुळे शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई.

🔥कारंजा व आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा निधी मंजूर.

वर्धा -/ जुलै ते ऑगस्ट या कालावधीत वर्धा जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसान भरपाईचा निधी शासनाने मंजूर केला असून वर्धा जिल्ह्यातील एकूण ४०,८६३ शेतकऱ्यांना ३७ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे, अशी माहिती सुमित वानखेडे यांनी देत आणखी माहिती देतांना पुढे सांगितले की, प्रामुख्याने कारंजा व आर्वी तालुक्यातील ४७३० बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतजमीन खरडून गेल्यामुळे शेतीच्या व पिकांच्या नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत निवेदन दिले होते.माहे जुलै ते ऑगस्ट महिन्यात कारंजा व आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या शेतमालाचे तथा अती पावसाने शेत जमीन खरडून वाहुन गेल्याने अतोनात नुकसान झाले होते. परीणाम शेतकरी वर्ग चिंतातूर झाले होते. याबाबत शेतकऱ्यांनी सुमित वानखेडे यांच्याकडे वस्तुस्थितीची कैफियत मांडली होती. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या बिकट परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुमित वानखेडे यांनी वर्धा जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या वस्तुस्थिती बद्दल माहिती दिली होती. सुमित वानखेडे यांनी शेतकरी हितार्थ दिलेल्या निवेदनाचा वारंवार पाठपुरावा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केला होता.शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने बळीराजाला मदतीचा हात दिल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांचे आभार सुमित वानखेडे यांनी मानले असुन या नुकसान भरपाईने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार असल्याने आर्वी व कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत सुमित वानखेडेंचे आभार मानले आहेत.

ब्युरो रिपोर्ट साहसिक news -24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!