हिच ती महालक्ष्मी इस्पात (S M W) कंपनी येथे झाला होता महिलेचा लैंगिक छळ.
देवळी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होऊन सुद्धा कंपनीचे दुर्लक्ष.
देवळी /महालक्ष्मी कंपनी(S M W) इस्पात कंपनीमध्ये सुरक्षा गार्ड प्रमुख रविशंकर प्रसाद याने महिलेसोबत असभ्यतेचे वागणूक केल्याने सदर महिलेने देवळी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यावर पोलिसांकडून देवळी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवून रविशंकर प्रसाद याला अटक करून कारवाई करण्यात आली.या कार्यवाहीमुळे महालक्ष्मी स्टील कंपनी(S M W) इस्पात या कंपनीचे नाव सामोर आले त्यामुळे कंपनी व्यवस्थापक कमिटीने ताबडतोब कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करून त्याची हकलपट्टी करणे गरजेचे होते.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी व्यवस्थापक ब्रिजेश यादव हा आरोपीचा नातेवाईक असल्यामुळे हे प्रकरण जुने असल्याचे सांगत आहे.सदर प्रकरणावर पडदा टाकला असल्याचे चर्चा जोरात सुरू आहे.या संदर्भामध्ये कंपनीचे (सी ई ओ) प्रतीक बिंदल,यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया देण्याचे टाळले व कंपनी व्यवस्थापक ब्रिजेश यादव,यांनी सदर प्रकरण जुने असून माहिती देण्यास उडवा उडवी चे उत्तरे दिले.महालक्ष्मी(S M W)इस्पात कंपनीमध्ये महिला कर्मचारी सुद्धा काम करतात पण सदर प्रकरणामुळे महिलांमध्ये धास्ती निर्माण झाली असल्याचे चर्चा सुरू आहे.महिलांना सुरक्षा देण्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षात्मक धोरणाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी महिला मंडळांनी पत्रकारांसोबत संवाद साधून मत व्यक्त केले.या महालक्ष्मी(S M W)इस्पात कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात पर प्रांतीय बिहारी लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये भरणा आहे.येथे काम करणारे बिहारी कामगार एकमेकांशी नाते संबंधित असल्याणे एक जूट दाखवण्याचा प्रयत्न करतात व महाराष्ट्रीयन कामगारांना व नागरिकांना रोजगार मिळू देत नाही त्यामुळे येथे कंपनीच्या विरोधामध्ये नाराजीचा सूर नेहमीच चर्चेला जातो.या इस्पात कंपनीने याची दखल घेऊन महाराष्ट्रीयन लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे तसेच अश्लील चाळे व असभ्य वर्तणूक करणाऱ्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना त्यांना घरचा रस्ता दाखवण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.अन्यथा इथे मोठे आंदोलन होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.