सुरगावला विविध उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी….

0

🔥सुरगावला विविध उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी.

वर्धा -/ स्वर्गीय समीर धांदे मित्रपरिवार व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती सुरगावात विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्यात आली
दिनांक 17 2 2026 ला कस्तुरबा रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराच्या आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन गावातील आरोग्य सेविका सौ वैशाली बावणे,सौ अर्चना थुल अंगणवाडी सेविका चंदाताई कांबळे, सौ सुनिता भगत, आरोग्य सेवक श्री निकेश सुरकार तसेच सेवाग्राम रुग्णालयाचे डॉक्टर यांच्या माध्यमातून करण्यात आले याप्रसंगी गावातील तरुण मित्रमंडळीने रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले
दिनांक 19 2 2026 ला मित्रपरिवारच्यावतीने सकाळी सात वाजता श्री संत नानाजी महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले सायंकाळी ठीक सात वाजता अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने नित्य प्रार्थना करणारे उपासक व उपासिका यांच्या माध्यमातून प्रार्थना सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रबोधन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री नितीन फासगे मुख्याध्यापक यशवंत विद्यालय सेलू कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप काळे प्राचार्य यशवंत महाविद्यालय सेलू प्रमुख अतिथी जनार्दन शिरपूरकर निवृत्त मुख्याध्यापक श्री संत नानाजी महाराज विद्यालय सुरगाव श्री श्याम वानखेडे कार्यक्रमाचे संयोजक व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन स्वागत समारंभ पार पडला याप्रसंगी प्रास्ताविकातून श्री श्याम वानखेडे यांनी कार्यक्रमाचे नियोजनाचे महत्त्व व रूपरेषा अधोरेखित केली मान्यवर वक्त्यांनी आपल्या अमोघ वाणी मधून महाराजांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला याप्रसंगी मार्गदर्शन करत असताना प्रमुख अतिथी श्री शिरपूरकर सरांनी महाराज कसे चारित्र्यसंपन्न होते यावर प्रकाश टाकला तर प्रमुख अतिथी श्री नितीन फासगे सर यांनी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातीतील माळव्यातील गुण ओळखून त्यांच्या माध्यमातून स्वराज्य कसे उभे केले व वर्तमान स्थितीमध्ये तरुणांनी महाराजांचा कोणता आदर्श समोर ठेवला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.तर विशेष अतिथी डॉक्टर शकुंतला पाराजे मॅडम तहसीलदार सेलू यांनी मोबाईलच्या माध्यमातून उपस्थित शिवप्रेमी ना मार्गदर्शन करताना महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व अधोरेखित करून त्यांचा आदर्श ठेवून तहसीलदार म्हणून तालुक्याची सेवा करीन अशी ग्वाही दिली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संदीप काळे यांनी तरुण पिढीने मोबाईलच्या आहारी न जाता महाराजा सारखी कर्तव्य तत्परता जपून समाजाच्या सेवेसाठी पुढे आले पाहिजे यावर प्रकाश टाकला
त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने महाराजांना अभिवादन करत असताना जय घोषणा करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गुरुदेव प्रेमी संजय ठाकरे यांनी केले उपस्थित शिवप्रेमी साठी समितीच्या वतीने लंगरची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमासाठी गावातील बालक तरुण ज्येष्ठ व्यक्ती महिला भगिनी तसेच तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री अभय पाटील वैभव वानखेडे मनोज वानखेडे सूरज थूल उमेश कांबळे संकेत कुबडे शैलेश सहारे सुरज चौधरी वानखेडे धीरज चौधरी सोनवणे ,वरठी पाटील, मंगेश वानखेडे नितेश वानखेडे सचिन मखरे गायकवाड, मंगेश कांबळे अभि मारापे विजू वानखेडे, ठाकरे, ओम वानखेडे तसेच अनेक तरुणांनी सहकार्य केले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!