🔥संतविचार ज्ञानयज्ञ,तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन.
सेलू -/ तालुक्यातील नजीकच्या सुरगाव येथील अभिनव धुलीवंदनसह संतविचार ज्ञानयज्ञाची पंरपरा गेल्या 28 वर्षांपासुन कायम आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा १२.१३ व १४ मार्च असा तीन दिवस हा होलिकोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्याने विविध प्रकाराचे धार्मिक, सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. श्री संत नानाजी महाराज गुरुदेव सेवा मंडळासह, ग्रामस्थाच्यावतीने अभिनव धूलिवंदनासह संतविचार ज्ञानयज्ञाची जय्यत तयारी करण्यात आली आहे १२ मार्चपासुन हा साहेळा सुरु होणार असून बुधवारी सायंकाळी ५ वाजता नायब तहसिलदार मधुकरराव ठाकरे.मंडळ अधिकारी रमेश भोले. सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल लुंगे एम बी महाकाळकर उदूघाटन होणार आहे.यांनतर सामुदायिक. प्रार्थाना शैक्षणिक मार्गदर्शन.भजनाचा कार्यक्रम होणार आहे.तसेच गुरुवार ग्रामसफाई,सामुदायिक ध्यान,नामधून योगासन, शेतकरी मेळावा, सामान्यज्ञान परिक्षा, बाल मेळावा, सर्वधर्म समन्वय संमेलन सामुदायिक प्रार्थना होणार आहे.तसेच दिनकरराव चोरे यांचे किर्तन होणार आहे. शुक्रवार पहाटे ग्रामसफाई, सामुदायिक ध्यान, सकाळी ६ वाजता धूलिवंदन संदेश व प्रभातफेरी, त्यानंतर सत्संगपर्वा अंतर्गत कार्यकर्ता, सत्कार दान वाटप,प्रबोधन आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी, भाऊसाहेब थुटे तर प्रमुख पाहुने मोहनबाबू अग्रवाल,माहेन भाऊ गुजरकर मुरलीधरराव बेलखोडे, अनिल नरेडी शंकरराव मोहोड,सुनिल बुंराडे भाष्करराव वाळके सुरेशराव नागपूरे प्रकाश कदम किशोर भाऊ करंदे उकेश चांदनखेडे संजय तिगावकर यांच्यासह मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे.