सेलूत 35 वर्षीय विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या

0

प्रतिनिधी / सेलू

आपल्या राहत्या घरी 32 वर्षीय विवाहित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सेलू शहरात वार्ड क्रमांक 3 मध्ये घडली, सुरज ओमप्रकाश इंगोले रा, वार्ड नं 3 सेलू असे मृत व्यक्तीचे नाव आहे, अशी माहिती आज ता, 24 रावीवरला सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली आहे,
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मृतकाची आई व पत्नी घरी नसल्याने सुरज इंगोले याने ही संधी साधून लहान मुलीच्या पाळण्याच्या दोराने घराच्या छताला गळफास लावला, घरची मंडळी घरी येताच हा प्रकार लक्षात आला, शेजारच्यांच्या मदतीने त्याचे गळ्यातील फास काढून त्याला सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला तपासले असता त्याचा मृत्यू झाला होता, सेलू पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले, त्याने शहरातील एका सावकारापासून कर्ज घेतले होते, त्याने पैशासाठी तगादा लावल्याने आत्महत्या केली अशी चर्चा सुरू आहे, याप्रकरणी सेलू पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे, आज रविवारी त्याचेवर सेलू येथील मोक्षधामावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याचे पश्चात पत्नी, 1 मुलगी व आई असा आप्त परिवार आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!