सोयाबीन पिकावर हुमणी रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत,महागावं चे कृषी विभाग अनभिज्ञ….

0

🔥सोयाबीन पिकावर हुमणी रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत,महागावं चे कृषी विभाग अनभिज्ञ

महागावं -/ यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात सर्वाधिक शेतजमीन क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा असून मृग नक्षत्रासह अर्दरा नक्षत्रात देखील पिकांना हवा तेवढाच पाऊस पडल्याने शेत जमिनीत किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे या किडीमध्ये शेत पिकांना कोवळ्या अवस्थेतच नष्ट करणाऱ्या हुमणी अळीचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असल्याची ओरड शेतकऱ्यातून केल्या जात आहे.

हुमणी रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिक हुमणी मुळे नष्ट होताना दिसून येत आहे अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर उद्भवलेल्या हुमणी रोगाच्या प्रादुर्भावाने आर्थिक संकटाच्या खाइत लोटले असल्याचे वास्तव पुढे येत असून याबाबतीत तालुक्यातील कृषी विभागाकडून हवे तसे मार्गदर्शन मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकरी सैरभैर झाल्याचे दिसून येत आहे
सोयाबीन पिकावर उद्भवलेल्या या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडून अनेक प्रकारच्या कीटक नाशकांच्या फवारणीचा वापर करण्यात येत असला तरीही हुमणीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली असल्याचे दिसून येत आहे याबाबतीत कृषी विभागाकडून सखोल व हवे तसे मार्गदर्शन मिळत नसल्याने कृषी केंद्र चालकांनी हुमणी रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिलेले कीटकनाशक वापरण्या पलीकडे शेतकऱ्यांना दुसरा पर्याय राहिला नसल्याने याबाबतीत तालुका कृषी विभागाने वेळीच दक्ष होऊन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसून येत आहे खरीप हंगामाच्या तोंडावर पेरणी व लागवड खर्चासाठी शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून व खाजगीतून घेतलेले कर्ज कसे फेडावे व कुटुंबाचा गाडा कसा हकावा या विवंचनेत तालुक्यातील

सोयाबीन उत्पादक शेतकरी अडकला असल्याचे धक्कादायक वास्तव दिसून येत असून या रोगाचा सोयाबीन पिकाच्या जास्तीत जास्त क्षेत्रावर प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महागांव तालूका कृषी विभागाने तात्काळ पावले उचलून याबाबतीत शेतकऱ्यांना तात्काळ मार्गदर्शन करण्याची मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांतून केल्या जात आहे.

कय्युम पठाण साहसिक News-/24 महागावं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!