महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा उपक्रम.
वर्धा /महिला स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागते.त्यामुळे महिलांनी वयाच्या तिशीनंतर स्वतःच्या प्रकृती विषयक अधिक जागरूक होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्मिता पावडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात महिला शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन प्रसंगी डॉ. पावडे यांनी महिलांच्या आरोग्य संबंधाने घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. नीतू गावंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे होते.
यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात क्रांतीज्योती सावित्रीआई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये अनिता भारती, उमा साहू, ज्योतिष्मती नागतोडे, शुभांगी बुरघाटे, सीमा लाटकर, शुभांगी डिग्रसे, स्वाती सुधीर सवाई, प्रविणा अशोक सोमकुंवर यांंचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यस्तरीय पाक्षिक वार्तापत्र सुरू करणाऱ्या प्रशांत निंभोरकर व पवन बानोकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
सावंगी मेघेतील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील पथकाने महिलांची आरोग्य विषयक व हिमोग्लोबिन तपासणी केली.
याप्रसंगी शिक्षक समितीचे जिल्हा नेते तथा कर्मचारी बँकेची उपाध्यक्ष रामदास खेकारे, कर्मचारी बँकेच्या संचालिका सुवर्ण अहेरराव, शिक्षक समितीच्या पदाधिकारी सीमा आत्राम श्रद्धा देशमुख नंदा कोल्हे सीमा पांढरकर यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अजय बोबडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन स्मिता जवजवार यांनी केले. जिल्हा उपाध्यक्ष अतुल उडदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशाली चिकटे, सुधीर सगणे, अजय मोरे, श्रीकांत अहेरराव, अजय काकडे, चंद्रशेखर ठाकरे, सुदेश खोब्रागडे, विनायक मेंघरे, सुरेश ढोले, प्रदीप देशमुख, विनीत आहाके, पेन्शन आघाडीचे जिल्हाप्रमुख श्रीकांत केंडे, राजेश महाबुधे, योगेश्वर खेवले, प्रशांत ढवळे राकेश साटोणे, नितीन डाबरे, मनीष ठाकरे, रवींद्र कुटे, किशोर कामडी, चंद्रशेखर शिवणकर, पद्माकर हांडे आदींसह सर्वांनी सहकार्य केले.