हिंगणघाट -/हकिकत याप्रमाणे आहे कि, दि 17/08/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना,त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा सुलतानपुर शिवार येथे एका पांढ-या रंगाच्या होंडा सिटी कार क्र. एम.एच. 34 के 3747 यावर सापळा रचुन दारूबंदीबाबत प्रो.रेड कार्यवाही केली असता, कारमध्ये असलेल्या आरोपीतांना पोलीसांचा सापळा लक्षात येताचं, ते कार जागीचं सोडुन अंधाराचा फायद्याघेत मोक्कावरून पळुन पसार झाले, पंचासमक्ष कारची पाहणी केली असता, त्यात 32 सिलबंद खरर्ड्याचे खोक्यात देशी दारूचा माल मिळुन आल्याने, सदर दारूचा माल व कारसह जु.कि. 9,20,000 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर दारूचा माल व कार हि आरोपी नामे 1) दिक्षीत उर्फ घुटली भगत रा. संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट 2) सुदन भगत रा. सुलतानपुर, तह. हिंगणघाट यांचे मालकिचे असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यांच्यावर पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन,अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. उमाकांत राठोड, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, संजय बोगा, शेखर डोंगरे अभिषेक नाईक, विनोद कापसे, अनुप कावळे यांनी केली.