देवळी -/तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोळोणा (चोरे) येथे स्वतंत्रदिनाच्या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.वर्ग ६ ते ७ चा गट यामध्ये प्रथम क्रमांक संतोषी बंडुजी कौराते, दितीय क्रमांक समीक्षा सुरेश कुरसिंगे,तृतीय क्रमांक श्वेता अमरदीप ताकसांडे या विद्यार्थीनीचा आला.वर्ग १ ते ५ प्राथमिक गट.यात प्रथम क्रमांक पाखी प्रवीण जळीत,द्वितीय क्रमांक परी सुनील अढाऊ,त्रितिय क्रमांक सिमरन दिपक शेंडे या विद्यार्थीनीचा आला.शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी उस्फुर्तपणे भाग घेतला होता. स्वतंत्र दिनाचे पर्वावर कोळोणा (चोरे )गावाचे सरपंच मा. ज्ञानेश्वर थोटे, हेमंत मुनेश्वर, उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याद्यापक प्रशांत नामदेवराव ढोले, प्रविणा मैत्रे मॅडम, राजश्री शेरजे मॅडम, योगेश सुरतकर,दीपक चावरे, उमेश चावरे, मंगेश काकडे,सौ. सारिका अढाऊ (उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापण समिती, कोळोणा चोरे )पोलीस पाटील दिक्षा मुनेश्वर, पौर्णिमा भगत, नंदा पाचखेडे इत्यादी मान्यवर मंडळीच्या हस्ते रांगोळी स्पर्धातील विद्यार्थी यांचे भेट वस्तू व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.लीडर माता म्हणून सौ. मंगला बंडुजी कौराते व सौ. प्रणिता दीपक शेंडे यांचा प्रमुख पाहुणे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.या यशाबद्दल देवळी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी मा. राजेश रेवतकर, ढगे मॅडम, विस्तार अधिकारी, संजय बैस, केंद्रप्रमुख, केंद्र गौळ,त्र्यंबक कौराते (अध्यक्ष शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष, कोलोना चोरे ), विजय पापडकर, कल्पना धनुस्कर, मंगेश काकडे भाऊराव थुल यांनी अभिनंदन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रविणा मैत्रे मॅडम यांनी केले. आभार राजश्री शेरजे यांनी केले. यावेळी एकूण सतरा विद्यार्थी यांनी भाषण दिले. यावेळी गावातील प्रतिष्टित मान्यवार मंडळी उपस्थित होती.खाऊ देऊन कार्यक्रम समाप्त झाला.