🔥आष्टी तहसील कार्यालयातील हवामान केंद्र मोजतेय शेवटची घटका.
आष्टी शहीद -/ आष्टी तहसील कार्यालयात उभारण्यात आलेले स्वयंचलित हवामान (पर्जन्यमान )केंद्र काही वर्षांपूर्वी उभे करण्यात आले. मात्र तेव्हापासून यां केंद्राची साफ सफाई करण्यात आली नसल्याने यां केंद्राच्या भोवती झाडें झुडूपे वाढली असून गवत वाढले आहे. यां यंत्रकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याचे साध्याचे चित्र आहे.
सविस्तर असें कि,
आष्टी तहसील कार्यालयाच्या परिसरात महावेध प्रकल्पानंतर्गत स्वयं चलित हवामान (पर्जन्यमान )केंद्राची उभारणी करण्यात आली असून येथे लागून असलेल्या फालकावर महाराष्ट्र शासन आणि स्कायमेंट वेबर सर्व्हिसेस प्रा. ली. शाखा सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प असें नाव नमूद आहे. सद्या पावसाळा सुरु असून तालुक्यातील गावात किव्हा आष्टी शहरात किती पर्जन्यमान झाले याबाबतीत पाहणी करण्यासाठी गेल्यावर हवामान केंद्र च शेवटची घटका मोजत आहे असें चित्र दिसलें. हवामान केंद्रात हिरवी रान तुळशी ची झाडें वाढली असून गवत ही वाढले असल्याचे दिसलें. आता हवामान केंदराची साफ सफाई कोण करणार हे मात्र कोडे आहे. शासनाचे हवामान केंद्र च आजारी पडले असें दुष्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आज आहे.