वर्धा -/जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने स्वरतरंग-2025 हा रसिकांसाठी पर्वणी ठरणारा बहारदार कार्यक्रम शनिवार 22 रोजी सायंकाळी वर्धा शहरातील लोक विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान वर्धा शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी तसेच आम नागरिकांना कुठल्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये म्हणून वर्धा शहरातील काही मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या सूचनेवरून बदल करण्यात आला आहे. वर्धा शहरातील गर्जना चौक ते साईनगर चौक हा मार्ग कार्यक्रम स्थळी पोहोचणाऱ्या व्हीव्हीआयपी व्यक्तींसाठी राहणार आहे. तर वंजारी चौक ते आर्वी नाका चौक हा मार्ग सर्वसामान्य व्यक्तींसाठी कार्यक्रम स्थळी पोहोचण्याकरिता खुला राहणार आहे. पण संबंधित मार्गावर कुठल्याही अवजड वाहनाला दुपारी 3 ते रात्री 12 पर्यंत एन्ट्री राहणार नाही. कुणीही संबंधित सूचनांकडे दुर्लक्ष करणे किंवा पाठ दाखवल्यास त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.