🔥उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
हिंगणघाट -/पुणे येथील स्वारगेट बसस्थानक परिसरात महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिलां कडून निषेध करीत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली.
पुणे येथील स्वारगेट बसस्थानक मधील शिवशाही बस मध्ये महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेबद्दल महिलांकडून तीव्र निषेध केला. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार व स्थानकावर बसमध्ये होणाऱ्या छेडछांनी घटनावर आळा बसवा. भविष्यामध्ये अशा घटना घडू नये याकरिता बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे तसेच बसस्थानक परिसरात पोलीस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष मीना सोनटक्के, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर, विधानसभा उपाध्यक्ष विद्या गिरी, शहर उपाध्यक्ष दिपाली रंगली, शहर सरचिटणीस सविता गिरी, ओबीसी शहराध्यक्ष आचल वकील, अमिता मुदाफळे, नालंदा राऊत, शितल माटे, रूपाली खोब्रागडे, अर्चना खरडे,, सुनीता गुरनुले, माया भोयर, रमा दुर्गा, सुनिता कुमरे आदी महिला उपस्थित होत्या.