पवनार / येथे दत्तू उर्फ दिंगाबर यांचे स्वताचे हॉटेलचे गच्चीवरून टिन उचलून दुसरीकडे हलवित असताना टिनाचा हाई टेन्शन लाईन ला स्पर्श झाल्याने विजेचा झटका लागून दत्तू मंगरुळकर वय वर्ष ४५ या युवकाचा इसमाचा मृत्यू झाला.सदर घटना दुपारी दोन चे सुमारास घडली.असून बस स्थानक परिसरात दत्तू उर्फ दिंगाबर यांचे दत्त हॉटेल व रेस्टॉरंट या नावाने हॉटेल असून महाशिवरात्रीचे दिवशी सदर हॉटेल चा शुभारंभ झाला होता. काल झालेल्या वादळामुळे अस्ताव्यस्त झालेले टिनाचे पत्रे सावरताना सदर घटना घडली.त्यांचे हॉटेल वरून हाई टेन्शन लाईन गेलेली होती.तसेच दत्तू यांना पत्नी व दोन लहान मुले असून त्यांचेवरून वडिलांचे छत्र हरविले.अचानक घडलेल्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त असून दत्तूच्या मनमिळावू स्वभावामुळे तो लहान मोठ्यात चांगलाच परिचित होता.स्थानिकांनी त्यांना लगेचच सेवाग्राम हॉस्पिटल रुग्णालयात नेले.परंतु डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले.सेवाग्राम पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली असून पोस्टमार्टम नंतर अंत्यसंस्कार २१ मार्च ला १२ वाजता च्या दरम्यान परमधाम मोक्षधाम वर करण्यात येत आहे तसेच त्यांच्या मागे दोन मुले पत्नी भाऊबंड आई बहीण असा आप्त परिवार आहेत तसेच पुढील तपास सेवाग्राम पोलीस करीत आहे.