हिंगणघाट -/स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियन च्या मागण्या हिंगणघाट नगर परिषद व कंत्राटदार यांनी मान्य केल्याने बेमुदत घंटागाडी बंद आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती सुनिल तेलतुंबडे यांनी दिली.हिंगणघाट येथील नगर परिषद चालक,कामगार महिला व हेल्पर कामगारांच्या मागण्या तात्काळ निकाली काढाव्या या साठी स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियन चे नेते सुनिल तेलतुंबडे यांचे नेतृत्वात ०४ सप्टेंबर २०२४ पासून बेमुदत घंटागाडी बंद आंदोलन करण्यात आले.तसेच ०५ सप्टेंबर ला हिंंगणघाट नगर परिषदेचे प्रशासकिय अधिकारी विशाल ब्रामणकर व साईट इंचार्ज मोहित राऊत,कंत्राटदार सुशांत मुळे यांनी घंटागाडी महिला ट्रॅक्टर ड्राइवर,हेल्पर यांना पगार वाढ,एप्रिल महिन्यात प्रती वर्ष ५०० ₹ पगार वाढ, मार्च महिन्याचा पगार ०७ एप्रिलला करणे, इपिएफ रक्कम जानेवारी २०२१ पासून १७ सप्टेबर २०२३ पर्यत क्लियर करून इपिएफ पावती देणे,इपिएफ नंबर न मिळालेल्या कामगारांना २० दिवसांत इपिएफ नंबर व पावती देण्यात यावी,माहे जुलै २०२४ ची पगाराची पावती दिनांक ११ संप्टेंबर २०२४ पर्यत देणे,कुंदन चांदूरकर यांना हिंगणघाट येथे ०१ ऑक्टोबर २०२४ पासून कामावर घेणे, पगाराची तारीख प्रती महिने प्रमाणे २० ते ३० तारखेपर्यत करणे, कामावरून कमी केलेल्या कामगारांना संघटनेला विश्वासात घेऊन कामावर घेणे, पगारा व्यतिरिक्त कंत्रादाराने इतर कपाती नियमित कराव्या या मागण्या मान्य करुन न.प. हिंगणघाट व कंत्रादार यांनी लेखी पत्र देण्याचे मान्य केले असल्याने बेमुदत घंटागाडी बंद आंदोलन मागे घेत असल्याचे कामगार नेते सुनिल तेलतुंबडे यांनी सांगितले. विशेषतः या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप घेण्यात आला नाही.उपरोक्त मागण्याबाबत नगर परिषद हिंगणघाट व मे. विश्वेश हायड्रोटेक प्रा .ली .नागपूर यांनी लेखी पत्र न दिल्यास स्वतंत्र म्यूनिसिपल कंत्राटी कामगार युनियन चे अध्यक्ष विक्की सहारे यांनी यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या आंदोलनात शाहरुख असलम शेेख,उपाध्यक्ष दिलीप सुनानी,सरचिटणीस अर्जुन जुमडे, सहसरचिटणीस सचिन कांबळे व सदस्य रमेश कांबळे,सुमित बागेश्वरचित्रू महानंद,रत्नकेतू दुर्गे,अब्दुल रवीश,रज्जाक शेेख, धम्मपाल तावाडे,गणेश मैसेकर नितेश मोगरे,मयूर जांबुलकर, कैलास कोटकर,गौरव चाफले आदी सल्लागार संघटनेचे पदाधीकारी व घंटागाडी महिला ट्रॅक्टर हेल्पर तीनही विभागाचे कामगार आंदोलनात सहभागी होते.