हिंगणघाटात ऑटोमोबाईल दुरुस्ती दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान…

0

🔥हिंगणघाटात ऑटोमोबाईल दुरुस्ती दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान.

हिंगणघाट -/ शहरातील कैलास सांयकार यांच्या ऑटोमोबाईल्स व दुरुस्ती दुकानाला रविवारी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्यामुळे दुकानातील वाहन दुरुस्तीचे साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घटनेदरम्यान 112 चे पेट्रोलिंग पथक शहरात गस्त घालत असताना ही आग त्यांच्या निदर्शनास आली. पथकप्रमुख प्रवीण बोधाने व स्वप्निल जीवने यांनी तात्काळ समयसूचकता दाखवत नगरपरिषद हिंगणघाट अग्निशामक दलाचे प्रमुख गौरव गाणार व सुनील डोळस यांना माहिती दिली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटच्या अग्निशामक दलालाही तातडीने पाचारण करण्यात आले.
दरम्यान दुकानाच्या पाठीमागील भागात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कचरा पेटविल्याचे दिसून आले असल्याने त्यातूनच आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. आग पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
नगरपरिषद हिंगणघाट अग्निशामक दलाचे अधिकारी गौरव गाणार यांच्या मार्गदर्शनात सुनील डोळस, होम लडी, किशोर मुंजेवार व वैभव ऐलगंदेवार तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अग्निशामक दलातील विनोद मंडलवार, वैभव मात्रे, आकाश महल्ले, राहुल कोटफळे व महेश चेनेवार यांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले. तसेच 112 पथक, हिंगणघाट पोलीस स्टेशन व गृह रक्षक दलाने घटनास्थळी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली.

         इकबाल पहेलवान                साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!