हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय लागत मेडिकल कॉलेजची जागा निश्चित करा…

0

🔥माजी आमदार तिमांडे यांचे नेतृत्वात आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.

🔥हिंगणघाट शहरातील जनतेची मागणी.

हिंगणघाट -/ शासकीय मेडीकल कॉलेजसाठी उपजिल्हा रूग्णालयाला लागुन असलेल्या ४१ एकर जागा निश्चित करण्यात यावी तसेच वर्धा जिल्यातील सिंदी(रेल्वे) ला तालुका घोषित करणयात यावे तसेच सरकारने हिंगणघाटला जिल्हा घोषित करण्यात यावे या मागणीसाठी पावसाळी अधिवेशन २७ जुन पासुन माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्या नेतृत्वात माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे हिंगणघाट खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष उत्तमराव भोयर, प्रहारचे गजानन कुबडे माजी कृषी अधिकारी दिलीपराव वांदिले,राजेंद्र नंदागवळी, अनंता भोयर भाऊसाहेब झिरपे भाऊसाहेब तौर, विजय उईके पुंडलिक भगत पुंडलिक, तिजारे रवींद्र कोटेवाले, राजेंद्र निस्ताने दिलीप उरकुडकर इत्यादींच्या साथीने धरणे आंदोलनाला आझाद मैदान मुंबई येथे बसले आहे.
शासकीय मेडिकल कॉलेज उपजिल्हा रुग्णालयाला लागुन असलेल्या ४१ एकर जागेमध्ये करण्यात यावे या मागणीचे निवेदन माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,नामदार हसन मुश्रीफ यांची सयाद्री अतिथी गृह येथे भेट घेतली तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सुद्धा भेट घेऊन निवेदन द्वारे मागणी केली आहे.
शासकीय मेडिकल कॉलेजसाठी वर्धा जिल्हाधिकारी ह्यांचा वेळा येथील प्रायव्हेट जागेचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला.राजकीय दबाव तंत्र वापरून आमदार साहेब ह्यांनी हिंगणघाट शहरातील लोकांवर केलेला अन्याय आहे.स्वतःचा आर्थिक फायदासाठी हे मेडिकल कॉलेज वेळा येथे पळवले असा समज सध्या नागरिकांमध्ये आहे.सरकारी दवाखान्याच्या आजू बाजूला धनाढ्य व्यापारी आणि राजकीय लोकांना भविष्यात व्यापार करायला जागा उपलब्ध नाही म्हणून ते कॉलेज वेळाला पळवत आहे अशी चर्चा शहरात जोरात सुरू आहे.हिंगणघाटला ४०० बेड हॉस्पिटलला मंजुरी व बांधकामासाठी १५१ कोटींच्या निधीचा जनप्रतिनिधी कडुन मोठा गाजावाजा करण्यात आला होता.१०० बेड सारखीच ४०० बेडची भविष्यात अवस्था राहणार असल्याने जनसामान्यांच्या १५१ कोटींचा चुराडा कशासाठी? असा प्रश्न हिंगणघाट शहरातील नागरिकांना पडत आहे.
महाराष्ट्र शासनाने वर्धा जिल्हातील हिंगणघाट येथे शासकीय मेडीकल कॉलेज निर्माण करण्याची घोषणा २०२३ च्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली असुन मा.जिल्हाधिकारी वर्धा यांनी जागेबाबत लवकरात लवकर स्थान निश्चित करावे अशी सुचना केली होती.
त्याप्रमाणे संघर्ष समितीने संदर्भित तारखेला हिंगणघाट शहरात उपजिल्हा रूग्णालयाला लागुन असलेल्या ४१ एकर शासकीय जागेची माहिती व सर्वे नंबर १८०,१८१,१८२,१८३,१८४,१८५,१८६, १९० एकुण जमीन १६.५२ हेक्टर ४०.८ एकर मौजा पिंपळगाव सोबत सातबाराच्या प्रति दिनांक ०९ जुन २०२४ ला संघर्ष समतीच्या पदादिकारी यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांची भेंट घेऊन मागणी लक्षात आणुन दिली.
संघर्ष समितीने दाखविलेली जागा नागरिक व प्रशासनाच्या सोयीची असुन रहदारीच्या रेल्वे व राष्ट्रीय महामार्गावर असल्याने सर्वाच्या दृष्टिने हितकारक आहे.असे असतांना हया जागेबाबत काय अडचणी आहेत हे अजुनही आम्हाला कळले नाही. मेडीकल कौन्सीलचा सदस्यांना ही जागा दाखविण्यातच आली नाही अशी चर्चा आहे.
उपजिल्हा रूग्णालय हिंगणघाट येथे ४०० खाटांचे रूग्णालय मंजुर झाले असुन तरतुत केलेली आहे. ती जागा उपजिल्हा रूग्णालयाच्या मागील शासकीय जागेवर आहे.
शासनाने १५१ कोटीची तरतूद केलेली आहे.ती जागा उपजिल्हा रुग्णालयाच्या मागील शासकीय जागेवर आहे.
पत्रकार परिषदेच्या वृत्तपत्रातील प्रकाशित बातमीनुसार साखर कारखाना वेळा येथे दान स्वरूपात मिळत असलेल्या ४० एकर जागेवर शासकीय मेडीकल कॉलेज निर्माण करण्याचा विचार आहे अशी चर्चा सुरू आहे.
त्यामुळे आपण दाखविलेल्या जागेपैकी मेडीकल कौन्सीलने नेमकी कोणती जागा फायनल केली असुन संघर्ष समितीने सुचविलेल्या उपजिल्हा रूग्णालयाच्या मागील ४१ एकर जागेवरच मेडीकल कॉलेजसाठी मंजुर करण्यात यावे.तसेच वर्धा जिल्यातील सिंदी(रेल्वे) ला तालुका घोषित करणयात यावे तसेच सरकारने हिंगणघाटला जिल्हा घोषित करण्यात यावे या मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांच्या सह सहकाऱ्यांच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

इकबाल पहेलवान साहसिक news -/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!