हिंगणघाट डि.बी.पथक पोलिसांची अवैध दारू वाहतुक करणाऱ्यावर मोठी कारवाई….

0

हिंगणघाट -/ येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे ला हजर असता, मूखबीर कडून खात्रीशीर माहीती मिळाली की, कुणाल धोटे नावाचा इसम त्याचे ताब्यातील चारचाकी वाहनाने जाम रोडनी हिंगणघाट कडे दारुचा माल घेऊन वाहतूक करीत आहे.अशा खात्रीशीर माहितीवरून वरून सदर माहीती पोलीस निरीक्षक मनोज गभने यांना देवून त्याचे मार्गदर्शनात पंच व पोस्टाँप सह नाकेबंदी करीत असताना माहितीप्रमाणे चारचाकी वाहन येताना दिसल्याने पो.स्टाफचे मदतीने नाकेबंदी करून सदर वाहन त्यास थांबवून पंचांसमक्ष चालक नामें कुणाल विनोद धोटे वय 24 वर्ष राहणार नंदोरी हिंगणघाट यांचे ताब्यातून 4 खरड्याच्या खोक्यात प्रीमियम नंबर वन कोकण देशी दारूचा 400 शीशा किंमत 40,000रू, hundai कंपनीची i-20 गाडी क्र MH04 dy 1335 कीं 1,50,000रू असा एकूण जुमला किंमत 1,90,000रू चा माल बिना पास परवाना अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने पोस्ट हिंगणघाट येथे अपराध क्रमांक 1308/2024 कलम 65(अ )(ई ), 77(अ ) दारूबंदी कायदा सहकलम 3(1),181,130/177 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.ही संपूर्ण कारवाई मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन सा,मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांच्या मार्गदर्शनात व मा.मनोज गभने पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोउपनि भारत वर्मा, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राहुल साठे, पो.ना विवेक वाकडे पोशी आशिष, नेवारे,पो.शि. विजय काळे, यांनी केली.

ईकबाल पहेलवान साहसिक news -24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!