हिंगणघाट तालुक्यात पावसाने दिली जोरदार हजेरी,तर शहरात कोसळली वीज…..

0

हिंगणघाट -/ शहरात आज सकाळी ७ वाजेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली,तालुक्यातही अनेक ठिकाणी सकाळी सहाच्या दरम्यान जोरदार पावसाची नोंद झाली, शहरातील संत तुकडोजी वार्ड येथे विज कोसळल्याची घटना घडली तर तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना पावसाचे पाणी चढल्याने काही काळ वाहतूक बंद राहिली.सकाळी ११ वाजता नंतर मात्र पाऊस थांबल्याने परिस्थिती सावरली.
उमरी ते पिंपळगाव,येनोरा,कुंभी ते सातेफळ मार्ग आज १९ रोजी नदी नाले उफांडून वाहू लागल्याने वाहतुकीकरीता बंद होते, येथील पुलांवरुन पुराचे पाणी वाहू लागल्याने या गावांचा बराच वेळ संपर्क तुटला होता.आज सकाळी नांद धरणाचे पाणी सोडल्याने तसेच पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले,
तालुक्यातील नागरिकांनी आपल्या जीविताची तसेच पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
🔥शहरात कोसळली वीज🔥
हिंगणघाट शहरात संत तुकडोजी वार्ड कलोडे सभागृह परिसरात विज कोसळल्याची माहिती आहे.ही घटना सकाळी ७.२० वाजताचे दरम्यान घडली,येथील रहिवासी नितीन पाटील,पोलिस कर्मचारी पंकज घोडे यांचे घरांची इलेक्ट्रिक मिटरसह घरची विद्युत लाईन पूर्णपणे जळाली, नगरपालिका अभियंता अली यांचे निवासस्थानातील दोन खोल्यांची इलेक्ट्रिक केबल जळाली. अनेकांचे विद्युत उपकरणे निकामी झाल्याने त्यांना मोठे नुकसान झाल्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ईकबाल पहेलवान साहसिक news -/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!