हिंगणघाट तालुक्यात मुसळधार पाऊस, ४८ तासांत ४१ मिली पावसाची नोंद,हिंगणघाट तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत…..

0

🔥हिंगणघाट तालुक्यात मुसळधार पाऊस, ४८ तासांत ४१ मिली पावसाची नोंद,हिंगणघाट तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत.

हिंगणघाट -/ हिंगणघाट तालुक्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवल्याने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे, सततधार पावसामुळे शेतात साचलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे.
हिंगणघाट शहरातील वेणानदीसुद्धा दुथड्या भरून वाहू लागली,
आज सकाळी हिंगणघाट तालुक्यात मुसळधार पावसामुळे यशोदा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे, ज्यामुळे अल्लीपूर ते आलमडोह रस्त्यावरील वाहतूक प्रभावित झाली आहे.
आलमडोह, सोनेगाव या गावाचाही संपर्क तुटला आहे.
नदीकाठची शेते मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली आहेत, ज्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हिंगणघाट तालुक्यात अनेक रस्ते बंद झाले आहेत.
हिंगणघाटमधील वना नदीच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. वडगाव धरणातून वना नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे, त्यामुळे नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे.
प्रशासनाने लोकांना सतर्क केले असून नदीकाठावरील नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. हिंगणघाट पालिका प्रशासन पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीकरिता अलर्ट मोडवर असून नागरिकांचे बचावासाठी पथक कार्यरत असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी दिली.
गेल्या ४८ तासांपासून सततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचा फटका बसलेला भाग आहे. तालुका प्रशासनाने जनतेच्या संरक्षणासाठी योग्य पावले उचलण्यात आली असून पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
तालुक्यातील यशोदा नदी परिसरातील जुन्या चानकी गावातील ४ मजुरांना ३.३० तासाच्या अथक परिश्रमानंतर तालुका प्रशासनाला यश मिळाले आहे.

🔥नदीकाठच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.शेतकरी त्यांची पिके वाचवण्यासाठी धडपडत आहेत.

गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शहरातील अनेक निवासी भागात पाणी साचले आहे.
शहरातील नव्याने वसलेल्या नागरी वस्त्यातील घरात पाणी शिरल्याने हिंगणघाट येथील नागरिकांचे बरेच नुकसान झाले आहे.
कालपासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे कामकरी व छोट्या व्यावसायिकांचेसुद्धा नुकसान झाले.
तालुक्यातील चानकी येथील नदीच्या पुरात ४ गवंडी काम करणारे मजूर अडकले होते. प्रशासनाने एनडीआरएफ चमूने बबलू विश्वकर्मा, दिनेश यादव, उमाशंकर वरखेडे, शिवकुमार उईके यांना पुरातून वाचवण्यात यश आले असल्याची माहिती तहसीलदार योगेश शिंदे यांनी दिली.
उद्भवलेल्या पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचेवतीने जिल्ह्यात सर्वत्र सावधानतेचा इशारा देण्यात आला असताना जिल्हाधिकारी सी वान्मथी यांनी हिंगणघाट तालुक्यात भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पूरग्रस्त भागातील भगवा, आलमडोह तसेच चानकी येथे भेट दिली. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी व मदत साहित्य वितरणासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.
हिंगणघाट तालुक्यात मुसळधार पावसामुळे यशोदा नदी तसेच वणा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
आज दुपारपासून तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला असून परिस्थिती आटोक्यात असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ईकबाल पहेलवान साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!