हिंगणघाट पोलिसांची अवैध दारू वाहतुकी करणाऱ्या वर कारवाई…..

0

हिंगणघाट -/ येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात नाईटगस्त पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा हर्षल उर्फ बाब्या धोटेकर हा त्याचे साथीदारा सह चारचाकी वाहन क्रमांक MH 02 BG 9815 वाहनामध्ये अवैदयरित्या विदेशी दारूचा साठा विक्री करण्याचे उद्देशाने बाळगून रिठे काँलनी, संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट येथे वाहतूक करून घेवून येत आहे,अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती प्रभारी ठाणेदार संतोष शेगावकर यांना देवून त्याचे आदेशाने रिठे काँलनी, हिंगणघाट येथे पो. स्टाँप सह रवाना होवून तेथे नाकाबंदी केली. असता मिळालेल्या माहीती प्रमाणे चारचाकी वाहन क्रमांक MH 02 BG 9815 गाडी दारूचा माल घेवून येतांना दिसल्याने त्यास पो. स्टाफचे मदतीने नाकाबंदी करून थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे रोडवर न थांबविता समोर काही दुर अंतरावर नेवून वळन रस्त्यावर अंधाराचा फायदा घेवून गाडी सोडून पसार झाले. पंचासमक्ष मोक्यावर चारचाकी वाहनांची डिक्कीची पाहणी केली असता डिक्कीमध्ये विदेशी दारूने भरलेल्या ओसी ब्लू कंपनीचे विदेशी दारूचे एकून 7 खोके प्रती खोक्यामध्ये 180 मिलीच्या 48 शिश्या अश्या एकून 336 शिश्या, विदेशी दारूने भरलेल्या राँयल स्टँग कंपनीचे एकून 2 खोके प्रती खोक्यामध्ये 180 मिलीच्या 48 शिश्या अशा एकूण 96 शिशा, विदेशी दारूने भरलेल्या राँयल ग्रिन कंपनीचे 2 खोके प्रती खोक्यामध्ये 180 मिलीच्या 48 शिश्या अशा एकूण 96 शिशा व जूने वापरती रेनाल्ट कंपनीची चारचाकी वाहन जिचा नोंदणी क्र MH 02 BG 9815 असा एकून 6,18,000 रू चा माल विनापास परवाना वाहतूक करतांना मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून पसार आरोपीता विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक नुरूल हसन साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक डाँ. सागर कुमार कवडे साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत सा. व मा.मनोज गभने, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनी अनिल आळंदे सा. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे,पोहवा अजहर खान, पो.ना राहुल साठे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे, पोशी अमोल तिजारे, पोशी मंगेश वाघमारे, पोशी शिवशंकर यादव यांनी केली. सदर गुन्हयांच पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

ईकबाल पहेलवान साहसिक news -/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!