हिंगणघाट -/ येथे आज १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजताचे दरम्यान एका प्रवासी महिलेला शौचालयात असलेल्या डस्टबिनमध्ये अर्भक मुलगा असल्याचे दिसून आले.
सदर बाबीची कल्पना एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
यावेळी ठाणेदार मनोज गभणे, पोलिस उपनिरीक्षक दिवाकर रामटेके, पोलिस कर्मचारी सागर सांगोळे, प्रवीण बोधाने इत्यादींनी घटनास्थळी भेट दिली.
मृतावस्थेत आढळलेल्या अर्भक मुलाचा पंचनामा करीत पोलिसांनी सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.