हिंगणघाट शहरात ईद मिलाद मोठ्या उत्साहात साजरी…

0

हिंगणघाट -/ येथे रबिउल अव्वल या इस्लामिक तारखेला शांतिचे दूत प्रेषित मोहम्मद साहेब यांचा जन्मोत्सव संपूर्ण जगभरात प्रेमाने आणि शांततेत साजरा केला जातो.तसेच हिंगणघाट मध्ये मरकजी सीरतुन नबी कमिटीच्या नेतृत्वाखाली डॉ.रुबा चौक येथून जामा मस्जिद , निशानपुरा वॉर्ड मस्जिद, टाका मस्जिद , स्टेशन फैल मस्जिद, पिली, मस्जिद , केजीएन मस्जिद , व सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.शहरातील प्रत्येक मस्जितील इमाम हजरत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मिरवणुकीत डॉ, रुबा डॉ. चौक, तहसील कार्यालय, तुकडोजी चौक, कारंजा येथून . चौक, सुभाष चौक, विठोबा चौक, आंबेडकर चौक आणि जामा मशिदीजवळ पोहोचल्यानंतर सर्वांसाठी महा भोजनाची व्यवस्था करण्यात आली,मिरवणुकीच्या मार्गावर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते ज्यात लहान मुलांसाठी बिस्किटे, आईस्क्रीम आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.दरवर्षी प्रमाणे मुस्लिम तरुणांनी पैगंबर साहेबांचा स्वच्छतेचा संदेश अंगीकारून मिरवणुकीच्या मार्गावरील घाण व कचरा साफ, सफाई करून समाजाला संदेश दिला आहे, त्यांच्या या उपक्रमाची दखल शहरातील सामाजिक लोकांनी त्यांच्ये अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या,मिरवणुकीत राजस्थानी गणेश मंडळ, शिवसेना यूबीटी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती, शीख समाजाच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले, यामध्ये सामाजिक बंधुता दिसून आले.मिरवणुकीच्या शेवटी मरकजी सिरतून नबी समितीचे पदाधिकारी अबरार फारुकी, शाहिद खान, सोहेल खान, नदीम अली, जुबेर पठाण, अज्जू शेख, बाबू जान, कलीम शेख, शादाब शेख, टोनू भाई, शादाब शेख, जुबेर खान, काशिफ शेख , कालू भाई , शोएब शेख, ऐफाज फारुकी, सोहेल रंगरेझ, दीपक भाऊ, रोमन मिर्झा, अबरार शेख, सरफराज रंगरेज , यांनी यावर्षी समितीचे कार्य छान पद्धतीने सांभाळून आपला कर्तव्य पार पाढला,ईद मिलाद च्या निमित्ताने आयोजन समितीने 12 दिवस विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून मिरवणूक यशस्वी करण्यासाठी समितीने अथक परिश्रम घेतले.

ईकबाल पहेलवान साहसिक news -24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!