🔥हिंगणघाट शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच. संत तुकडोजी वार्ड येथे तिन घरे दिवसाढवळ्या लुटली,
🔥चोरटे झाले मस्त,पोलीस झाले सुस्त.
हिंगणघाट -/ शहरातील संत तुकडोजी वार्ड मोहता बगीचा परिसरात आज पुन्हा दिवसाढवळ्या तिन चोरींच्या घटना घडल्याची माहिती मिळाली.
लेबर कॉन्ट्रॅक्टर प्रमोद पाटील यांच्याकडे आज दुपारी १२ वाजताचे दरम्यान ही चोरीची घटना घडली.घरी कुणी नसल्याचे हेरून चोरट्यांनी साडेतीन तोळे सोन्याचे दागिन्यासह ७०हजार रोख रकमेवर दरोडा घातला.
याच परिसरात दोन चांदीचे शिक्के व ३५०० रुपये रोख लांबविले, मनिष गोटे हे पंचायत समितीला कार्यरत आहे. त्यांचेघरी कुणी नसल्याने चोरट्यांनी हात साफ केला.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी शहरातील तुकडोजी वार्ड याच भागात ३१ मे रोजी ४- ५ चोरींच्या घटना घडल्या असताना आज शुक्रवारी पुन्हा दोन घटना घडल्याने पोलिसांपुढे आवाहन निर्माण झाले आहे. चोरट्यांनी रेकी करून घरची मंडळी घरी नसल्यावर हात साफ केल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही घटना दुपारीच झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पुढील तपास हिंगणघाट पोलिस तपास करीत आहेत, दरम्यान वर्धा येथील डॉग स्कॉड पथक दाखल झाले परंतु चोरट्यांचा सुगावा लागला नाही.