🔥हिंगणा मतदारसंघात आमदार समीर मेघे यांची धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती.
हिंगणा -/ हिंगणा मतदारसंघातील विविध धार्मिक कार्यक्रमांना आमदार समीर मेघे यांनी उपस्थित राहून श्रद्धाळूंना शुभेच्छा दिल्या.शिवमंदिर, शुभमनगर वाघधरा तसेच प्रदीप कोटगुले यांच्या डिगडोह देवी येथील घरी आणि खडगाव येथे नागद्वार यात्रेनिमित्त आयोजित कढई कार्यक्रमात आमदार मेघे सहभागी झाले. त्यांनी नागदेवतेच्या पूजेला नमन करून आरतीतही सहभाग नोंदवला.दरम्यान, वाडी शहरातील वैष्णव मातानगर, खडगाव रोड येथे पार पडलेल्या सुंदरकांड कार्यक्रमातही आमदार समीर मेघे उपस्थित राहिले. त्यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून भक्तांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमांना नागद्वार सेवक, प्रमुख पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.