हिंगणा वाडीमध्ये श्री. संताजी मंडळाची वार्षिक आमसभा यशस्वीरित्या पार पडली….

0

🔥हिंगणा वाडीमध्ये श्री. संताजी मंडळाची वार्षिक आमसभा यशस्वीरित्या पार पडली.

हिंगणा -/ रविवार रोजी हिंगणा वाडी येथे श्री. संताजी मंडळाची वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न झाली. आमसभेचे निमंत्रण सर्व सभासदांना देण्यात आले होते. प्रारंभी संताजी महाराजांची पूजा-अर्चना करण्यात आली. सभेचे सुत्रसंचालन मंडळाचे सचिव श्री. सचिन थोराणे यांनी केले.यावेळी दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा जमा-खर्च अहवाल कोषाध्यक्ष प्रकाश घाटोळे यांनी वाचून दाखविला आणि उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात त्यास मंजुरी दिली.कार्यक्रमात अध्यक्ष श्री. चंद्रशेखर येणुरकर यांनी मनोगत व्यक्त करत मंडळाच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुरुषोत्तम रागीट, शैलेश थोराणे, राजेश थोराणे, विनायक रागीट, नामदेवराव केवटे, अशोक भिवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एकमुखाने चंद्रशेखर येणुरकर यांची पुन्हा एकदा २०२५ ते २०२८ या कालावधीसाठी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व गुलदस्ता देऊन सत्कार करण्यात आला. सुमित चाफले यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.कार्यक्रमास संजय बेलखोडे, भारत केवटे, सुरज गिरडकर, विजय नासरे, पुरुषोत्तम इखार, निळकंठ कोचे, उमेश गोमासे, सुभाष पडोळे, सुधीर कल्हाने, लक्ष्मण आकरे, अविनाश सालनकर, शरद साखरकर, अरविंद निरगुळकर, निशांत मदनकर, महेश चरडे यांच्यासह अनेक मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.

गजानन ढाकुळकर साहसिक News-24 हिंगणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!