🔥हिंगणी रोडवर दुचाकी ची दुचाकीला धडक,एक ठार तरचार जखमी.
सेलू -/ हिंगणी बोरधरण मार्गावर किन्ही शिवारात दोन दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर अन्य चार जण जखमी झाल्याची घटना आज सोमवारी 26 जानेवारी ला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली
सोमवारी 26 जानेवारी असल्याने बोरधरण कडे जाणार्या वाहनाची संख्या अधिक असते त्यातच काही तरूण भरधाव वेगाने वाहन चालवतात यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका असतो अशातच बोरधरण कडे आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच 32 बीए 8796 ने तिघे जात असताना समोरून हिंगणीकडून येणार्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच 31 एव्ही 9884 ने जबर धडक दिल्याने यात अक्षय विलास येरखेडे कारला चौक वर्धा यांचे निधन झाले तर त्याचे सहकार्यासह दुसऱ्या दुचाकी वरील तिघे जण चार जण जखमी झाले जखमीमध्ये वैष्णवी पडाल वय 20 वर्ष,सुजल मोहीजे वय 24 वर्ष, निखिता मोहीजे वय 27 वर्ष ,ओमप्रकाश वठ्ठी वय 37 वर्ष यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने उपचारासाठी सेलूचे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.