वर्धा /हिंगोली येथील बाळापुर तालुका बिज गुण केंद्रात (नर्सरी) च्या कार्यालयात कृषि पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ यांचा गुरुवारी भर दिवसा धारदार शस्त्राने खुन करण्यात आला. 7 दिवसाचा कालावधी झाला असताना अजुनही मारेकरी गवसले नाही. मारेकऱ्यांना त्वरित अटक करून कडक कारवाई करण्यात यावी व राजेश कोल्हाट यांना न्याय मिळावा. या मागणी करीता जिल्हाधिकारी, वर्धा व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा यांना महाराष्ट्र राज्य कृषि पर्यवेक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना, कृषि विभाग लिपिक संघटणा, कडुन निवेदन देण्यात आले.यावेळी कृषि पर्यवेक्षक संघटना चे प्रशांत भोयर, रजंना वानखेडे , रिना भगत, जाबुवंत मडावी , बाळकृष्ण मुसळे, संजय डोंगरे, शालु वहाने, कृषि सहाय्यक संघटना चे सुनिता मुरार, मोहीन शेख, लिपिक संघटनेचे रेष्मा बोरले, कुंदा गजभिये, विनेश धोरात वर्ग चार संघटणे चे प्रभाकर कुभांरे, मंजुळा चौधरी आदी उपस्थित होते. मात्र,राजेश कोल्हाळ हे आर्वी तालुक्यात कृषि सहाय्यक म्हणून कार्यरत होते. आठ महीण्या पुर्वी ते पदोन्नती ने स्व जिल्हात गेले होते.