हिंदी विश्‍वविद्यालयात महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन……

0

वर्धा -/ येथे ३० जानेवारी २०२५ रोजी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्‍या पुण्यतिथी निमित्त विश्‍वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. कृपाशंकर चौबे यांनी महात्‍मा गांधी यांच्‍या मुर्तीला सूतमाळ अर्पण करून अभिवादन केले. गुरुवार, ३० जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून गांधी हिल्‍स वर ‘शहीद दिन’ आयोजित करण्यात आला. गांधी व शांती अध्‍ययन विभागाचे अध्‍यक्ष डॉ. राकेश कुमार मिश्र कार्यक्रमाचे संयोजक होते.यावेळी विश्‍वविद्यालयातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, शोधार्थी आणि विद्यार्थ्यांनीही पुष्पांजली अर्पण केली आणि दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी, “वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड परायी जाने रे” आणि ‘दे दी हमें आज़ादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल’ अशी भजनं सादर करण्यात आली. या कार्यक्रमात क्षेत्रीय केंद्र कोलकाता, प्रयागराज आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा आणि तत्वज्ञान अध्‍ययन केंद्र, रिद्धपूर, अमरावती येथील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला.

रज्जू जळगावकर साहसिक NEWS-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!