🔥हुतात्मा राष्ट्रीय इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रतिकृतीची राज्यस्तरावर निवड.
आष्टी शहीद -/जे. बी. सायन्स कॉलेज, वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय ५३ व्या विज्ञान प्रदर्शनात हुतात्मा राष्ट्रीय इंग्लिश मीडियम स्कूल, आष्टी येथील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शाळेचे विद्यार्थी नैतिक संजय भार्गव व श्रेया नरेश भार्गव यांनी सादर केलेल्या “इंटिग्रेटेड इको स्मार्ट सिटी” या नाविन्यपूर्ण प्रतिकृतीला जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळून राज्यस्तरासाठी निवड झाली आहे. पर्यावरणपूरक विकास, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत जीवनशैली यांचा उत्कृष्ट समन्वय या प्रतिकृतीत साकारण्यात आला असून परीक्षकांनी त्याचे विशेष कौतुक केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राहुल श्रीधरराव ठाकरे, सचिव श्री. विनायकरावजी होले, उपाध्यक्ष डॉ. किशोर गंजीवाले, सहसचिव. भरतभाऊ वंजारा, कोषाध्यक्ष शंकराव नागपुरे, राजाभाऊ सव्वालाके तसेच अर्पित मालपे (संचालक, हुतात्मा स्मारक समिती, आष्टी) यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मार्गदर्शक शिक्षक चेतन वानखडे, उमेश मख व जया कोहळे तसेच विद्यार्थ्यांचे पालक यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.