हेमलता कांबळे यांचा खा.अमर काळे यांचे हस्ते सत्कार….

0

संकटातील व्यक्तीला मदत करून त्यांचे प्राण वाचविणे हीच खरी माणुसकी,खा अमर काळे..

पुलगाव -/ २७ जुलै रोजी खा.अमर काळे यांची पुलगाव येथील प्रिया रामटेके ले आउट येथील नागरिकांच्या समस्य समजून घेणे करिता भेट दिली असता प्रिया रामटेके ले आउट,पुलगाव येथे रहिवाशी असलेल्या हेमलता कांबळे यांनी त्यांचे घराजवळ असलेल्या वर्धा – अमरावती मार्गावर झालेल्या अनेक अपघातात त्यांनी पुढाकार घेऊन त्यांचे परिवाराचे मदतीने अनेक जखमी नागरिकांना मदत करून तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी पाठविल्याने अनेक जखमींचे प्राण वाचले,त्यांचे कार्य कौतुकास्पद असून यातून समाजात माणुसकीची जाणीव करून देणारी आहे,हेमलता कांबळे यांनी जखमी नागरिकांसह जखमी प्राण्यांना सुध्दा अनेक वेळा जीवदान देऊन स्वतःचे घरी त्यांना ठेवून त्याच्यावर उपचार करून घेऊन यामुळे अनेक प्राण्यांचे जीव वाचवण्याचे कार्य केले,त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून सद्या त्या या जिल्ह्यातील होमगार्ड मध्ये वर्धा पथकाच्या समादेशक अधिकारी म्हणून मानसेवी पदावर कार्यरत आहे, उल्लेखनीय बाब म्हणजे वर्धा पथकाच्या समादेशक अधिकारी या मानसेवी पदावर त्या प्रथम महिला म्हणून नियुक्त आहे.
या प्रसंगी खासदार अमर काळे यांनी हेमलता कांबळे यांना पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले,आज समाजात संकटातील व्यक्तीला मदत करणे ही खरी माणुसकी असून समाजात दिवसेनदिवस माणुसकी कमी होत असल्याचे अनेक घटना मधून आपण बघतो त्यामुळे हेमलता कांबळे यांचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे मत व्यक्त करून अस्य कार्याची दखल घेवून त्यांना प्रोत्साहित केल्यास समाजात मानवी हितासाठी सकारात्मक कार्य करण्याकरिता नागरिक नक्कीच प्रेरित होतील असा विश्वास व्यक्त केला.
हेमलता कांबळे यांनी होमगार्ड मध्ये घेतलेल्या प्रशिक्षनाचा त्यांना नक्कीच उपयोग होत असून त्यांचे आई कडून त्यांना प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मंचावर उपस्थित असलेले पी के रामटेके,माजी अध्यक्ष,सीएडी कॅम्प कर्मचारी संघटना,पुलगाव यांनी सुध्दा हेमलता कांबळे व त्यांचा परिवार मानवी हितासाठी करीत असलेल्या कार्याची स्तुती करून असेच कार्य निरंतर सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.या प्रसंगी प्रामुख्याने नागरिक उपस्थित होते.

सागर झोरे साहसिक news -/24 देवळी,पुलगाव 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!