१४ मार्चला वर्धेत अभिनव धुलीवंदन सोहळ्याचे आयोजन…

0

🔥प्रभातफेरीला सकाळी सात वाजता मातोश्री सभागृहापासून होणार सुरुवात.

🔥प्रभात फेरीतून साधनार सामाजिक जनजागृती,३० वर्षाची परंपरा- समाज प्रबोधनात्मक उपक्रम.

🔥 गुरुदेव सेवा मंडळ,वर्धा,धुलिवंदन उश्रीत्सव समिती आणि सेवाभावी आध्यात्मिक व सामाजिक संस्थेचे आयोजन.

वर्धा -/ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 56 व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त श्रीगुरुदेव सेवा मंडळ, वर्धा,धुलिवंदन उत्सव समिती आणि इतर सेवाभावी आध्यात्मिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अनिष्ट व तत्वहीन रूढींना फाटा देत, सामाजिक जनजागृती करणाऱ्या संस्कारक्षम अभिनव धुलीवंदन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक 14 मार्च 2025 रोजी सकाळी सात वाजता मातोश्री सभागृह येथून वर्धा शहरात प्रभात फेरीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
समाज प्रबोधनात्मक 30 वर्षाची परंपरा असलेल्या अभिनव धुलीवंदनाची सुरुवात प्रातःकाळी 4.30 ते 5.15 ग्रामसफाई आणि जमलेल्या कचऱ्याची होळी तसेच सकाळी 5.15 ते 6 वाजता सामुदायिक ध्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रभात फेरीची सुरुवात मातोश्री सभागृह, वर्धा येथून सकाळी 7 वाजता पासून होणार असून आर्वी रोड, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक(आर्वी नाका )राजेंद्र घोडमारे व मनमोडे यांचे घर, लालबाग गणेश मंदिर माऊली ज्ञानेश्वर महाराज मंदिर, खांदाडे पीठ गिरणी, गरीबशहा वली चौक, प्रार्थना मंदिर टेकडी ,ग्रामपंचायत पिपरी(मेघे )सुविधा केंद्र नर्मदेश्वर मंदिर, गिरीपेठ, विठ्ठल रुख्मिणी मंदिर, हनुमान गड कारला चौक, स्वागत कॉलनी रोड, सिद्धीविनायक मंदिर, महालक्ष्मी कॅटर्स, सत्यसाई बाल संस्कार केंद्र, राष्ट्रीय सामाजिक विद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उद्यान ते परत उर्वरित नियोजित कार्यक्रमाकरिता मातोश्री सभागृह असे मार्गक्रमण करणार आहे.धुलीवंदनाचा संदेश देत समारोपीय कार्यक्रम मान्यवर प्रमुख अतिथींच्या उपस्थित सकाळी 11 वाजता आयोजित आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीतेतील ओळीला कृतीत उतरवण्यासाठी गुरुदेव सेवकांनी व विविध सेवाभावी आध्यात्मिक सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या अभिनव धुलीवंदन सोहळ्यात वृक्षतोडीमुळे निसर्गाचा बिघडलेला समतोल, बाजारातील कृत्रिम रंगातील रसायनामुळे शरीराला होणारी हानी लक्षात घेण्यासाठी , पर्यावरण समृद्धीचा वारसा जपत मत्सर, द्वेष माणसांनी विसरून आनंददायी जीवन जगण्यात प्रेमाचा रंग कसा महत्वपूर्ण आहे.तसेच व्यसनाचे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी व इतरांना पटवून देण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!