🔥जेडीआयटीमध्ये तीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण किशोर दर्डाकडून प्रकरणावर पडदा टाकण्याचा निर्लज्ज प्रयत्न? 🔥नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके यांची ‘वावा’ फक्त फोटोपुरतीच.
यवतमाळ -/ शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या यवतमाळ शहरातील नामांकित ‘जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (JDIT) कॉलेजमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, गेल्या २ फेब्रुवारी रोजी या महाविद्यालयात एका नव्हे, तर तब्बल तीन निष्पाप मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले. मात्र, या धक्कादायक प्रकरणावर पोलिसांत कोणतीही नोंद होऊ नये आणि हे पाप दडपले जावे, यासाठी संस्थेचे संचालक किशोर दर्डा यांनी आपली संपूर्ण ताकद आणि माध्यमाचा नावाचा गैरवापर करून यंत्रणेला ‘मॅनेज’ केल्याचा खळबळजनक आरोप आता होत आहे. यवतमाळ शहरात सध्या किशोर दर्डा च्या नावाखाली दहशत निर्माण करण्याचे काम किशोर दर्डा नावाच्या व्यक्तीकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे. जेडीआयटी सारख्या प्रतिष्ठित संस्थेत विद्यार्थिनी सुरक्षित नसतील, तर पालकांनी विश्वास कोणावर ठेवावा? या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, त्यातून या अत्याचाराची भयावहता स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र, किशोर दर्डा याने आपल्या पदाचा आणि माध्यमाच्या वलयाचा वापर करून तक्रारकर्त्यांना धमकावल्याचे समजते. पीडित मुली आणि त्यांचे कुटुंबीय इतक्या दहशतीत आहेत की, ते समोर येऊन तक्रार करण्यास धजावत नाहीत. यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर हे किशोर दर्डाचेच ‘पिल्लू’ असल्यामुळे सत्तेच्या वरदहस्ताने या गुन्हेगारांचे मनोबल अधिकच वाढले आहे की काय, असा संतप्त सवाल यवतमाळची जनता विचारत आहे.
यवतमाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी उईके यांनी निवडून आल्यावर मिरवत जाऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी ‘निर्भया’ आणि ‘दामिनी’ पथकाची मागणी केली आणि त्यांच्या पदभार स्वीकारण्याच्या दिवशी ही पथके कार्यान्वितही झाली. मात्र, शहराच्या नाकाखाली २ फेब्रुवारीला इतकी मोठी घटना घडली, मुलींच्या इज्जतीचे धिंडवडे काढले गेले, तरीही नगराध्यक्षांना याची साधी खबर नसावी का?’दै. साहसिक’ने हे वृत्त लावून धरले असताना आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला असताना, प्रियदर्शनी उईके यांची ही ‘ब्र’ न काढण्याची भूमिका संशयास्पद वाटत आहे. केवळ मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढून प्रसिद्धी मिळवणे हाच तुमचा हेतू होता का? जर तुम्ही महिलांच्या संरक्षणाचे आश्वासन दिले होते, तर आज या तीन पीडित मुलींना न्याय देण्यासाठी तुम्ही किशोर दर्डा आणि कॉलेज प्रशासनाविरुद्ध रस्त्यावर का उतरला नाही? किशोर दर्डा आणि त्यांच्या समर्थकांनी कितीही प्रयत्न केले तरी सत्याचा आवाज दाबता येत नाही. पीडित मुलींनी दाखवलेले धाडस आणि तो व्हायरल झालेला व्हिडिओ आता थेट राज्य महिला आयोगाच्या दरबारी पोहोचला आहे. ज्या पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाखाली येऊन या घटनेची नोंद घेतली नव्हती, त्यांना आता उत्तर द्यावे लागणार आहे. किशोर दर्डाच्या धमक्यांना न जुमानता या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींना तात्काळ तुरुंगात धाडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जेडीआयटी कॉलेजमधील ही घटना केवळ एक गुन्हा नसून, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. पैशाच्या जोरावर आणि माध्यमांच्या आडून गुन्हे दडपण्याचे दिवस आता संपले आहेत. फोकमतच्या नावाखाली इतरांना धमकावणाऱ्या किशोर दर्डाचे हे कृत्य यवतमाळच्या सुसंस्कृतपणाला चटका लावणारे आहे. या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळेपर्यंत आणि या गुन्हेगारांचा खरा चेहरा जनतेसमोर येईपर्यंत हा लढा थांबणार नाही.
नगराध्यक्षांनी केवळ नावापुरती पथके मागवून घेऊ नयेत, तर त्या पथकांचा वापर करून अशा नराधमांच्या मुसक्या आवळाव्यात. अन्यथा, यवतमाळची जनता येणाऱ्या काळात या राजकारण्यांना आणि शिक्षणसम्राटांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.(क्रमशः)