🔥सिंदी रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयाचा मागणीकरिता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटील साहेब यांनी विधानसभा भवनात विषय मांडला.
🔥राष्ट्रवादीचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, अमोल सोनटक्के, आशिष देवतळे यांनी घेतला पुढाकार.
सिंदी रेल्वे -/ सिंदी रेल्वे येथे गेल्या वीस वर्षापासून सातत्याने ग्रामीण रुग्णालयाकरिता नागरिक मागणी करीत आहे. या मागणीसाठी राष्ट्रवादीचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते जयंत पाटील साहेब यांना निवेदन दिले. यावेळी अमोल सोनटक्के, आशिष देवतळे, सुनिल भोमले उपस्थित होते. या निवेदननाच्या अनुषंगाने जयंत पाटील साहेब यांनी सिंदी रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला असून
सिंदी रेल्वे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी खासदार अमर काळे, वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून या आंदोलनात पाठिंबा दिला होता. सिंदी रेल्वे परिसरातील नागरिकांनी स्वतःचा रक्ताने 1500 पेक्षा जास्त पत्र लिहुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविणार आहेत.
सिंदीत टाळ-मृदंगाचा गजर झाला, निवेदने दिली, आश्वासने ऐकलीष्ठ पण प्रशासन हलले नाही, अखेर संतापलेल्या सिंदीकरांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्याचा निर्धार केला आहे. आमच्या जिवाशी खेळ थांबवा ग्रामीण रुग्णालय द्या, असा संदेश या रक्तपत्रांतून देण्यात आला आहे. या आंदोलनात सर्व धर्म, सर्व समाज, सर्व पक्ष आणि सर्व वयोगटातील नागरिक एकदिलाने उतरले. सत्ताधाऱ्यांनी आता तरी डोळे उघडावेत. सिंदीसह लगतच्या २५ गावांचा आरोग्य प्रश्न सोडवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे तातडीने ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे या ठाम मागणीसाठी विधानभवनात हा विषय मांडण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे जेष्ठ नेते जयंत पाटील यांना वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी निवेदना द्वारे केली. या मागणीची दखल घेऊन जयंत पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे तातडीने ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा विषय विधानभवनात उपस्थित केला.
यावेळी सिंदी येथील अमोल सोनटक्के, आशिष देवतळे, सुनिल भोमले, महेश राऊत, बबलू खान, रामेश्वर घंघारे, रवी वाघमारे, किशोर सोनटक्के, महेश काटोले उपस्थित होते.