आर्वी -/ एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना आर्वी नजीक नेरी पुनर्वसन येथे घडली असून याप्रकरणी आर्वी पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेऊन एक अल्पवयीन व 4 आरोपींना अटक केली
दिनांक 10 फेब्रुवारी रोजी रात्री 7 ते 8.30 च्या दरम्यान अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना आर्वी नजीक असलेल्या नेरी पुनर्वसन या गावा नजीक घडली
पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने मला आर्वी येथून नेरी पुनर्वसन येथे बळजबरीने नेले व तेथे माझ्यावर सामूहिक अत्याचार केला दिलेल्या तक्रारीची आर्वी पोलिसांनी दखल घेऊन पास्को कायदा अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून 4 आरोपी तसेच एक अल्पवयीन मुलाला अटक केली असून प्रकरणात आरोपीच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे प्रकरणाची 137( 2) 64 (1) 70 (2) गुन्ह्याची नोंद करून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुचिता मंडवले व आर्वी पोलीस स्टेशनची चमू करीत आहे
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन यांनी आर्वी पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती देऊन पुढील तपासासंबंधी मार्गदर्शन केले